सावरकरांनी प्रत्यक्ष कृतीतून समरसतेचा मार्ग दाखवला – सूर्यकांत पाठक
पुणे : एकात्मता आणि समरसतीची संकल्पना ही आपल्या देशाला श्रेष्ठ बनवणारी आहे. प्राचीन काळापासून संत, समाज सुधारक आणि महापुरुषांनी समाजातील भेदाभेद दूर करून बंधू भावाचा संदेश दिला आहे. याच परंपरेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय ठरते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाज संघटित करण्यासाठी केवळ विचार मांडले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून समरसतेचा मार्ग दाखवला, असे ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.
ग्राहक पेठेतर्फे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्राहक पेठेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू मानकर उपस्थित होते.
सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९३१ मध्ये रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. त्यामध्ये सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी यांच्या आर्थिक पाठिंबामुळे हे मंदिर उभे राहिले, असे सांगत विविध प्रकारचे सावरकरांचे कार्य त्यांनी उपस्थितांसमोर उलगडले. राघवेंद्र मानकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले देव, देश, धर्मासाठीचे कार्य महान असल्याचे सांगितले.
