Tuesday, June 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून…? रोहित पवार यांनी उपस्थित केला गंभीर सवाल

 

मुंबई:   दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची किंमत तपास यंत्रणांना कळत नसल्यामुळे विमान अपघाताच्या तपासात विलंब होत आहे की विमान पुरवणाऱ्या व्हीआरएस कंपनीला पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळावा यासाठी? कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे का, असे सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

विमानाला आग लागल्यावर उच्च तापमानामुळे ब्लॅक बॉक्समधील माहितीचे नुकसान झाले आहे. दोन्ही रेकॉर्डर खराब आहेत. मात्र, एल थ्री मधील संवाद मिळाले आहेत, असे स्पष्टीकरण तपास यंत्रणांनी दिले आहे. त्यावरही रोहित पवार यांनी शंका व्यक्त केल्या आहेत.

मागील अनेक वर्षात झालेल्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सुरक्षितपणे हाती लागले आहेत. मात्र, याच विमानाचे ब्लॅक बॉक्स कसे खराब झाले, असा सवाल करून रोहित पवार म्हणाले की या सगळ्यामुळे अजित दादांच्या विमानाचा घातपात झाला की अपघात, या आपण यापूर्वी व्यक्त केलेल्या शंकेला दुजोरा मिळत आहे. मात्र, याबाबतची वस्तुस्थिती उघड केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

पक्ष विलीनीकरणापेक्षा तपास महत्त्वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस शहर चंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाबाबत आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद पुढे ढकलल्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, राजकारण हा नंतरचा विषय आहे. आमच्या दृष्टीने सध्या दादांच्या विमान अपघाताची चौकशी हा महत्त्वाचा विषय आहे. विलीनीकरणाबाबत काय चर्चा झाल्या, काय निर्णय झाले याची पूर्ण माहिती आपल्याकडे आहे. त्याबद्दलचे पुरावे ही आहेत. त्याबाबत नंतर बोलता येईल. त्याचीही माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल. मात्र, सध्या अपघात की घातपात याचा तपास हा महत्त्वाचा विषय आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading