Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवार यांचे आज अंत्यदर्शन; उद्या बारामतीत अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी व अमित शहा उपस्थित राहणार

बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिव आज संध्याकाळी सायंकाळी ५ वाजल्यापासून नागरिकांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्य सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार असून सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अंत्यसंस्कार बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानात पार पडणार आहेत. या अंत्यविधीसाठी देशभरातील प्रमुख नेते, राज्यातील मान्यवर, विविध पक्षांचे नेते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading