Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात वंचित आघाडीचे पुण्यात आंदोलन


पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नामूल्लेख आपल्या भाषणात केला नसल्याने महाराष्ट्रभर आंदोलने चालू आहेत .त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व निषेध करण्यासाठी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष अँड.अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली .त्यांनतर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे सर्व कार्यकर्त्यांनी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मांडून बसले व तक्रार दिली .
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अँड.अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले .यावेळी शहराध्यक्ष ॲड अरविंद तायडे, सागर आल्हाट, विशाल कसबे, किरण कदम, गौतम ललकारे, बि पी सावळे सर, नवनीत अहिरे, नितीन कांबळे, चंद्रकांत कांबळे, रेखा चौरे, रफिक शेख, प्रवीण बागुल, जाॅर्ज मदनकर, राजाभाऊ ढाले, दिपक कदम, राजेंद्र कांबळे, सचिन भडकवाड यासह पुणे शहरातील महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अँड.अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading