Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

Burger King® ऑपरेटर रेस्टॉरंट ब्रँड्स आशियाचे आयुष मधुसूदन अग्रवाल यांच्या इन्स्पिरा ग्लोबलकडून अधिग्रहण

मुंबई  : भारतामध्ये Burger King® तसेच इंडोनेशियामध्ये Burger King® आणि Popeyes® चालवणारी कंपनी रेस्टॉरंट ब्रँड्स आशिया लिमिटेड (आरबीए) आणि आरबीएची विद्यमान प्रवर्तक कंपनी QSR Asia Pte. Ltd. (एव्हरस्टोन कॅपिटलची बहुसंख्य मालकी) यांनी आज जाहीर केले की, ‘इन्स्पिरा ग्लोबल’ आरबीएमध्ये नियंत्रक हिस्सा संपादन करणार असून यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये अंतिम करार करण्यात आले आहेत. हे अधिग्रहण आवश्यक मंजुरीच्या अधीन राहील. प्रस्तावित व्यवहारामुळे QSR Asia Pte. Ltd. ची आरबीएमधून पूर्णपणे एक्झिट होणार असून, हे त्यांच्या नियोजित गुंतवणूक कालावधीशी सुसंगत आहे.

हा व्यवहार ‘इन्स्पिरा ग्लोबल’ची अन्न व पेय क्षेत्रातील शाखा Lenexis Foodworks Private Limited यांच्या माध्यमातून अंमलात आणला जाणार आहे. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या Lenexis कडे भारतातील 45 हून अधिक शहरांमध्ये 250 पेक्षा जास्त ‘Chinese Wok’ रेस्टॉरंट्सचे मालकी व संचालन आहे. या अंतर्गत, QSR Asia Pte. Ltd. कडील संपूर्ण 11.26% हिस्सा सुमारे ₹460 कोटींना विकत घेण्याबरोबरच, इन्स्पिरा ग्लोबल इक्विटी शेअर्सच्या प्राधान्य वाटपाद्वारे सुमारे ₹900 कोटी आणि वॉरंट्सच्या प्राधान्य वाटपाद्वारे सुमारे ₹600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या व्यवहारांमुळे आरबीएच्या सार्वजनिक भागधारकांसाठी ओपन ऑफर अनिवार्य होणार आहे. प्रस्तावित व्यवहार हा सर्व प्रचलित अटींच्या पूर्ततेवर अवलंबून असून, यामध्ये भागधारक व नियामक मंजुरी, भारतीय स्पर्धा आयोगाची (Competition Commission of India) मान्यता तसेच सेबीच्या टेकओव्हर नियमांचे पालन आवश्यक राहील.

या घडामोडींबाबत प्रतिक्रिया देताना रेस्टॉरंट ब्रँड्स आशियाचे संपूर्णवेळ संचालक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजीव वर्मन म्हणाले, “आयुष अग्रवाल आणि इन्स्पिरा ग्लोबल यांचे आमच्या नव्या प्रवर्तक म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतात मूल्यनिर्मितीचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड, दीर्घकालीन भांडवली पाठबळ आणि धोरणात्मक समन्वय यांच्या जोरावर आमची भक्कम वाढीची वाटचाल पुढे नेण्यात यामुळे मोठी मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या वाढीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना आरबीए आपली विद्यमान नेतृत्व टीम, कार्यपद्धती आणि ब्रँड ओळख पूर्णपणे कायम ठेवूनच कामकाज सुरू ठेवेल.”

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना इन्स्पिरा ग्लोबलचे आयुष मधुसूदन अग्रवाल म्हणाले, “आरबीए टीमने आतापर्यंत व्यवसाय उभारण्यात केलेल्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. हे अधिग्रहण आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मितीच्या दृष्टीने पाहत असून, लक्ष केंद्रीत व शाश्वत वाढीच्या माध्यमातून बाजारातील खऱ्या क्षमतेचा लाभ घेण्याचा आमचा मानस आहे. RBA च्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून आम्ही हा व्यवसाय अधिक बळकट आणि विस्तारत नेणार असून, विद्यमान व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या गुंतवणुकीमुळे ग्राहक व्यवसायांवर ‘इन्स्पिरा ग्लोबल’चा फोकस अधिक मजबूत होतो आणि वेगाने वाढणाऱ्या QSR क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक सखोल होते, जी ब्रँड जबाबदारी, कार्यक्षमता उत्कृष्टता आणि शिस्तबद्ध भांडवली गुंतवणुकीवरील आमच्या भराशी सुसंगत आहे.”

Burger King® आणि Popeyes® ब्रँड्सचे मालक असलेल्या रेस्टॉरंट ब्रँड्स इंटरनॅशनलचे आशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष राफेल ओडोरिझी म्हणाले, “आरबीएमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याबाबत ‘इन्स्पिरा ग्लोबल’ने दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल आम्हाला समाधान आहे आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. विद्यमान व्यवस्थापन टीमने उभारलेल्या भक्कम कार्यपद्धतीच्या पायावर उभे राहून ही भागीदारी व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

भारतामध्ये Burger King उभारण्याच्या प्रवासावर भाष्य करताना एव्हरस्टोन ग्रुपचे सह-संस्थापक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) समीर सैन म्हणाले, “12 वर्षांपूर्वी आम्ही वेगळ्या मेन्यू, उत्कृष्ट व्यवस्थापन टीम आणि एक दर्जेदार QSR ब्रँड उभारण्याच्या महत्त्वाकांक्षेसह भारतातील पहिले Burger King सुरू केले होते. आज देशभरात 575 हून अधिक आउटलेट्ससह त्या पायाभूत बाबी अजूनही भक्कमपणे कायम आहेत आणि व्यवसाय पुढील टप्प्यातील वाढीसाठी सज्ज आहे. एव्हरस्टोनचा प्रवास येथे पूर्ण होत असताना, आम्ही हा व्यवसाय एका अत्यंत सक्षम नव्या प्रवर्तकाकडे सोपवत आहोत, जो व्यवसायाबाबत खोल बांधिलकी आणि स्पष्ट, दीर्घकालीन दृष्टी दाखवत आहे.”

या व्यवहारासाठी बाठिया अॅडव्हायजर्स यांनी सल्लागाराची भूमिका बजावली असून, ओपन ऑफरसाठी मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेड व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading