Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा पैशांची उधळण

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा पैशांची उधळण केल्याचा आरोप होत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे तब्बल ३३ नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाकडून मोठ्या जल्लोषाचे आयोजन करण्यात आले.
या विजयानिमित्त एमआयएमकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली. तसेच ‘जशन-ए-महाराष्ट्र, जशन-ए-इम्तियाज’ या नावाने भव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळण झाल्याचा आरोप केला जात आहे.
यापूर्वीही बिहारमधील निवडणूक विजयाच्या वेळी इम्तियाज जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैशांची उधळण केल्याचा आरोप झाला होता. त्या घटनेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading