Monday, October 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईत 30 मजली ‘बिहार भवन’ उभारणीला मंजुरी; 314.20 कोटींचा निधी

मुंबई : मुंबईत लवकरच 30 मजली ‘बिहार भवन’ उभे राहणार आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारमधील सत्ताधारी भाजप–जेडीयू सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या भवनासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बिहारमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (युनायटेड) यांचे युती सरकार सत्तेत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई येथील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
प्रस्तावित इमारत तळघरासह 30 मजली असून, त्यात एकूण 178 खोल्या असतील. याशिवाय 72 जणांची क्षमता असलेला आधुनिक कॉन्फरन्स हॉल उभारण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या बिहारमधील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठी हे भवन महत्त्वाचे प्रशासकीय व निवास केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading