क्रेडाई पुणेच्या पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६च्या २४व्या आवृत्तीचा भव्य शुभारंभ
पुणे : क्रेडाई पुणे यांच्या वार्षिक मालमत्ता प्रदर्शनाच्या २४व्या आवृत्तीचा – ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ संकल्पना: ‘पूना ते पुणे’ शुभारंभ आज ५ एफ वर्ल्ड, जीटीटी डेटा आणि हनीवेल ऑटोमेशन इंडियाचे अध्यक्ष तसेच झेन्सार टेक्नॉलॉजीजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश नटराजन यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असून ते १८ जानेवारी २०२६ पर्यंत सर्वांसाठी सुरू राहणार आहे.
पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे गृहखरेदीदार व गुंतवणूकदारांसाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ असून, येथे परवडणाऱ्या घरांपासून आलिशान निवासी प्रकल्पांपर्यंत, को-लिव्हिंग व सीनियर लिव्हिंग पर्याय, एनए प्लॉट्स, प्रीमियम व्हिला तसेच ग्रेड ‘ए’ व्यावसायिक प्रकल्प उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात ८० हून अधिक विश्वासार्ह विकासक सहभागी झाले असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील ४०० पेक्षा अधिक महारेरा-नोंदणीकृत प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभास क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष अरविंद जैन, जे.पी. श्रॉफ आणि नितीन न्याती, तसेच श्री. रविंद्र डी. हिटनल्ली आणि संयोजक पुनीत ओसवाल उपस्थित होते. पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विकासक, वित्तीय संस्था, चॅनल पार्टनर्स आणि संभाव्य गृहखरेदीदार एका विश्वासार्ह आणि प्रभावी व्यासपीठावर एकत्र आले आहेत.
तसेच या उद्घाटनाच्या एक दिवस आधी क्रेडाई पुणे यांच्या वतीने D2C 3.0 — भारतातील सर्वात मोठे विकासक–चॅनल पार्टनर नेटवर्किंग व्यासपीठ — यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या परिषदेला १,००० हून अधिक चॅनल पार्टनर्सची विक्रमी उपस्थिती लाभली. यावेळी आघाडीच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून मार्गदर्शनपर सत्रे, AI आधारित विक्री संकल्पना, तसेच ज्येष्ठ विकासकांकडून बाजारातील ट्रेंड्सवर चर्चा करण्यात आली. या प्रचंड प्रतिसादामुळे बाजारातील सकारात्मक विश्वास आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत असून, तीन दिवसीय एक्स्पोसाठी भक्कम वातावरण तयार झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मनीष जैन म्हणाले, “क्रेडाई पुणे एक्स्पो हे खऱ्या अर्थाने एक भव्य, नियोजनबद्ध आणि दर्जेदार प्रदर्शन आहे. सुलभ नोंदणी व्यवस्था, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि विकासकांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग यामागे प्रत्येक विकासकाचा मोलाचा वाटा आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना एक उत्कृष्ट आणि समाधानकारक अनुभव मिळणार असून, नामांकित ब्रँड्स आणि विकासकांच्या सर्वोत्तम प्रकल्पांचे हे खरे अर्थाने एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध
करून देणारे व्यासपीठ आहे. मागील वर्षी या प्रदर्शनाला १८ हजारांहून अधिक संभाव्य गृहखरेदीदारांनी उपस्थिती लावली होती, तर यंदा हा प्रतिसाद अधिक वाढेल, असा विश्वास आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी येऊन येथे पुरेसा वेळ घालवावा, कारण येथे सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांची व विकासकांची विविधता अत्यंत व्यापक आहे. क्रेडाई पुणे एक्स्पोची खास ओळख म्हणजे येथे सहभागी असलेले सर्व विकासक क्रेडाई पुणे व महारेरा नोंदणीकृत, विश्वासार्ह आणि नैतिक आहेत. प्रामाणिकपणा आणि उच्च व्यावसायिक मूल्यांनुसार व्यवसाय करणाऱ्या विकासकांना एकत्र आणणे हीच क्रेडाईची ताकद आहे. एकाच छताखाली इतक्या विश्वासार्ह विकासकांचे प्रकल्प उपलब्ध झाल्याने खरेदीदारांचा वेळ वाचतो, तसेच त्यांना अधिक निवडीचे स्वातंत्र्य आणि पूर्ण पारदर्शकता मिळते.”
प्रदर्शनाबाबत प्रतिक्रिया देताना अरविंद जैन म्हणाले, “२४ वर्षांहून अधिक अनुभवाच्या जोरावर क्रेडाई पुणे एक्स्पो दरवर्षी अधिक परिपक्व होत असून, आम्ही स्वतः ठरवलेल्या निकषांनाही सातत्याने मागे टाकत आहोत. प्रत्येक आवृत्तीत स्टॉल्समध्ये सादर होणाऱ्या प्रकल्पांचा अत्यंत काळजीपूर्वक निवडलेला समतोल ठेवण्यात येतो, ज्यामुळे विकासक त्यांच्या सर्वोत्तम प्रकल्पांचे प्रभावी आणि सर्वसमावेशक सादरीकरण करू शकतात. हे व्यासपीठ चॅनल पार्टनर्ससाठी विशेष महत्त्वाचे असून, संपूर्ण रिअल इस्टेट परिसंस्था एकाच ठिकाणी पाहण्याची अनोखी संधी येथे मिळते, ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिक परिणामकारक आणि फायदेशीर ठरतो. हे प्रदर्शन सर्वांसाठीच विन-विन ठरते — चॅनल पार्टनर्सना दर्जेदार इन्व्हेंटरी उपलब्ध होते, खरेदीदारांना वेगवेगळ्या प्रकल्प स्थळांना भेट न देता अनेक पर्यायांची तुलना करता येते, तर विकासकांना गंभीर व लक्ष केंद्रीत ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाचतात.”
तसेच ते पुढे म्हणाले “क्रेडाई एक्स्पो हे असे एकमेव अधिकृत प्रदर्शन आहे, ज्यामध्ये क्रेडाईचे सर्व सदस्य पूर्ण सहभागाने सहभागी होतात. वर्षभरात अनेक प्रदर्शनांचे आयोजन होत असले तरी, क्रेडाई एक्स्पो हे रिअल इस्टेट उद्योगासाठी मानक (बेंचमार्क) मानले जाते. पुढील तीन दिवसांत २० हजारांहून अधिक अभ्यागत या प्रदर्शनाला भेट देतील, अशी अपेक्षा असून, हा अत्यंत लक्ष केंद्रीत आणि महत्त्वपूर्ण लक्ष्यित ग्राहकवर्ग आहे.”
या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. गणेश नटराजन म्हणाले, “क्रेडाई पुणे एक्स्पोसारखी व्यासपीठे गृहखरेदी प्रक्रिया सुलभ करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. विश्वासार्ह विकासक आणि विविध प्रकारच्या मालमत्ता पर्यायांना एकाच छताखाली आणल्यामुळे खरेदीदारांना तुलना करणे, मूल्यांकन करणे आणि आत्मविश्वासाने सुज्ञ निर्णय घेणे शक्य होते. अशा प्रदर्शनांमुळे पारदर्शकता आणि विश्वास अधिक दृढ होतो, तसेच पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि गतिमानता ठळकपणे अधोरेखित होते.”
‘क्रेडाई पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ हे प्रदर्शन दि. १६, १७ आणि १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.०० या वेळेत अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे आयोजित करण्यात आले असून, नागरिकांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे.
