वॉंग्रेसच्या समता भूमी -घोरपडे पेठ प्रभागातील उमेदवारांनी फुलेवाड्यातून केली प्रचाराला सुरुवात
पुणे : अखिल भारतीय कांग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समता भूमी – घोरपडे पेठ व डायस प्लॉट प्रभागातील उमेदवार रवी पाटोळे,अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुदेव सईद सय्यद यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात फुले वाड्यातून केली .
फुले वाडा म्हणजेच समता भूमी असून ,सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कर्तृत्वाने व कार्याने जगभर हे स्थान ओळखले जाते .त्याच ठिकाणी कांग्रेस पक्ष हा फुले यांच्या विचाराने चालत असल्याने त्यांचा विजय नक्की होईल असे मत नाही राज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .
समता भूमीत समतेचा विचार टिकवणे गरजेचे असून तो टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा समतेचा विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले .
समता भूमीतून आपल्या प्रचाराची सुरुवात येथील कांग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केली .यावेळी पुणे शहरातील कांग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
