Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

जमतारा वेबसिरिज मधील अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या

जळगाव: प्रतिनिधी 

पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावातील 25 वर्षीय उभरता अभिनेता आणि संगणक अभियंता सचिन चांदवडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

सचिनने गळफास घेताच त्याच्या कुटुंबीयांना त्याची चाहूल लागली. त्यांनी सचिनची गळफासातून मुक्तता करून त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला तातडीने धुळे येथील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

सचिन हा पुण्यातील आयटी पार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरी करत होता. त्याचप्रमाणे अभिनयाची आवड असल्याने तो या क्षेत्रातही प्रस्थापित होण्याची धडपड करत होता. त्याचा असुरवन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यापूर्वी त्याने विषय क्लोज या चित्रपटात व जमतारा सीजन टू या वेब सिरीजमध्ये काम केले होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading