आदित्य बिर्ला कॅपिटल संपूर्ण उद्योगव्यापी नवोन्मेषांसह वेग देत आहे एआय केंद्री धोरणाला
मुंबई : भारतातील आघाडीच्या विविधीकृत वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने एबीसीडी या आपल्या अग्रणी सर्वमार्गीय डीटूसी प्लॅटफॉर्मवर एआय-पॉवर्ड सुविधा व नवोन्मेषांच्या संचाची घोषणा केली आहे. वित्तीय बाबींचे सुलभीकरण करण्याच्या आणि सर्व माध्यमांमध्ये ग्राहकांना अतिव्यक्तीनुरूप, बुद्धिमान व अखंडित अनुभव देण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल सर्वात प्रथम एआयचा स्वीकार करणाऱ्या कंपन्यांमध्ये येते. कंपनीने सर्व व्यवसायांमध्ये वापरण्याजोगी एआय उपयोजने (अॅप्लिकेशन्स) विकसित करण्याच्या तसेच ग्राहक अनुभव, क्षमता व खर्च यांवर प्रभावाला चालना देण्याच्या उद्देशांनी २०२३ मध्ये संपूर्ण उद्योगव्यापी जेन एआय सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले आहे. केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने २२हून अधिक लाइव्ह जेन एआय यूजकेसेस उपयोगात आणल्या तसेच वाढ, उत्पादनक्षमता, संवाद व अनुभव यांना चालना देणारे नवोन्मेष जलद गतीने सर्व व्यवसायांमध्ये राबवण्यास सुरुवात केली.
आदित्य बिर्ला कॅपिटलमधील डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पेमेंट्स स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “डिजिटल रूपांतरण हा एबीसीएलमध्ये आमच्यासाठी धोरणात्मक कलाटणी देणारा घटक ठरला. जेन एआय अॅप्लिकेशन्सचा उपयोग केवळ प्रारंभिक संकल्पना स्पष्टीकरणाच्या (प्रुफ-ऑफकन्सेप्ट) स्तरावर न ठेवता त्यांचा पूर्ण क्षमतेने उपयोग काही मोजक्या कंपन्यांनी केला असला, तरी त्यांच्यातही ही अॅप्लिकेशन्स व्यापक स्तरावर उपयोगात आणणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांमध्ये आम्ही आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यकाळातील आव्हानांसाठी सज्ज, प्रसारक्षम उद्योग उभा करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. तसेच बुद्धिमत्ता, द्रष्टेपणा व ग्राहककेंद्री धोरण हे घटक आम्ही जे काही करत आहोत, त्याच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे ध्येयही आमच्यापुढे आहे. आमच्या एआयला प्राधान्य देण्याच्या धोरणामार्फत आम्ही ग्राहकांच्या प्रवासांची कल्पना नव्याने करत आहोत, उत्पादनांमध्ये नवोन्मेष घडवून आणत आहोत, अंडररायटिंगचे स्वयंचलन करत आहोत आणि उत्पादनक्षमता वाढवण्याच्या, खर्च कमी करण्याच्या व कार्यक्षमतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सेवा पूर्ततेत सुधारणा घडवून आणत आहोत. या प्रयत्नांमुळे आम्हाला अखंडित ग्राहक अनुभव देण्यात तसेच आमच्या सर्व व्यवसायांमध्ये शाश्वत, दीर्घकालीन वाढीच्या शक्यता खुल्या करण्यात मदत होत आहे.”
व्यापक व्यवसाय प्रभावाला चालना:
आपल्या विविध विभागांना व्यवसायाचे ज्ञान व एआय क्षमता व्यापकरित्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून कंपनीने सेल्स असिस्ट, सर्व्हिस असिस्ट, ऑडिट असिस्ट आणि मार्केटिंग असिस्ट यांसारखी जेन एआय असिस्ट साधने वापरात आणली आहेत. ही साधने विक्री विभागातील समूहांना एआय-आधारित प्रशिक्षण, रोल प्लेज तसेच उत्पादनक्षमता वाढवणाऱ्या तत्काळ उत्पाद सहाय्याद्वारे मदत करतात. सर्व्हिस असिस्ट हे साधन संपर्क केंद्रांवरील एजंट्सना ग्राहकांच्या शंका हाताळण्यास तसेच त्यांच्या विनंत्यांवर वेगाने प्रक्रिया करण्यासाठी व ग्राहकांना अधिक समाधान देण्यासाठी स्क्रिप्ट्स तयार करण्यास मदत करते; तसेच लेखा व मार्केटिंग कार्यप्रवाहांचे स्वयंचलन करून ग्राहकांना प्रतिसाद देण्यासाठी लागणारा वेळ (टर्नअराउंड टाइम) कमी करण्यात मदत करते. शिवाय, एजंटिक एआय उपयोजनांचा समावेश ग्राहकांच्या प्रवासात ऑनबोर्डिंगपासून केला जातो, अंडररायटिंग, दाव्यांचे व्यवस्थापन यांमध्ये प्रक्रियेचा वेळ कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. यामुळे प्रतिसादासाठी लागणारा वेळ व खर्च कमी होतो. जेन एआय व्हॉइस बॉट्समुळे टेली-विक्री, सेवा सुधारत आहेत तसेच प्रसारक्षमता व किफायतशीरता वाढवून ग्राहक टिकवून ठेवण्याच्या प्रवासातही त्यांचा उपयोग होत आहे.
या नवोन्मेषांमुळे आदित्य बिर्ला कॅपिटलला मायक्रोसॉफ्ट्स टॉप ५० अर्ली अडॉप्टर्स इन जेन एआय या अमेरिकेतील इग्नाइट २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे जनरेटिव एआयमध्ये उत्कृष्टतेला चालना दिल्याबद्दल ग्लोबल सिलेंट मॉडेल अवॉर्ड २०२५च्या स्वरूपातही कंपनीच्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे.
एआय सुविधा आणि नवोन्मेष क्षमतांचे प्रात्यक्षिक:
- सिम्प्लिफाय (SimpliFi): पर्सनल फायनान्स असिस्टण्ट: हा ७ एआय-पॉवर्ड सुविधांचा संच ग्राहकांचा व्यक्तीगत वित्तीय सहाय्यक म्हणून काम करणार आहे. पत, आरोग्य आणि खर्च यांबाबत हे साधन व्यक्तीनुरूप माहिती देऊ करते, हे साधन माय ट्रॅक विभागात उपलब्ध आहे. यामध्ये मार्केट पल्स, स्मार्ट सिग्नल्स आणि गोल कंपास अशा तीन सुविधा आहेत, यांद्वारे माहिती, इशारे व मार्गदर्शन हे सर्व एकदम नजरेखाली घालता येतील अशा पद्धतीने एकत्र आणले गेले आहे. ग्राहकांना बाजारातील हालचालींबद्दल मार्गदर्शन मिळू शकते, पोर्टफोलिओबद्दल माहिती मिळते, कृतींची शिफारस केली जाते आणि एकाच प्लॅटफॉर्मवरील मल्टी-अॅसेट प्रवर्गांसह लक्ष्य निश्चिती करण्यातही मदत केली जाते.
- नो युअर पॉलिसी या सुविधेमार्फत सिम्प्लिफाय कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी उलगडून दाखवते (डिकोडिंग), संरक्षणाचे तपशील तत्काळ दाखवते आणि पर्यायी योजनांशी तुलना करते. यामुळे ग्राहकांना आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत होते.
- संरक्षणात वाढ: आदित्य बिर्ला कॅपिटलच्या ‘हेल्थ-फर्स्ट’ मॉडेलनुसार, एबीसीडीने ग्राहकांसाठी संपूर्ण संरक्षण ही संकल्पना मांडली आहे. यामध्ये हेल्थ-ट्रॅक, हेल्थ-सेव्हर कार्डाचा समावेश आहे. त्याद्वारे सर्वसमावेशक व्यक्तिगत विम्यासह दात-डोळे तपासणी, औषधांच्या दरांत सवलत, पोषणाबाबत सहाय्य असे अनेक लाभ मिळू शकतात. तसेच वारसा नियोजनासाठी डिजिटल इच्छापत्राची सुविधाही दिली जाते.
- कॉन्सक्वेस्ट: हा अशा प्रकारचा पहिलाच लाइफ-सिम्युलेशन गेम असून, तो आर्थिक शिक्षणाचे व जागरूकतेचे रूपांतर एका लाभदायी, संवादात्मक अनुभवात करतो.
आदित्य बिर्ला कॅपिटलने आपल्या व्यवसाय प्रारूपाला नवीन आकार देत लक्षणीय रूपांतरण साध्य केले आहे, ‘वन कस्टमर, वन एक्स्पिरिअन्स अँड वन टीम (एक ग्राहक, एक अनुभव आणि एक टीम)’ या तत्त्वाद्वारे प्रेरित ‘वन एबीसी, वन पीअँड एल’ या धोरणात्मक दृष्टीकोनावर हे प्रारूप आधारलेले आहे. एमएसएमईंसाठी उद्योग प्लस–बीटूबी प्लॅटफॉर्म, एबीसीडी–डीटूसी अॅप आणि स्टेलर बीटूडी प्लॅटफॉर्म असे तीन डिजिटल प्लॅटफॉर्म्स उभे करण्यासाठी कंपनीने प्रबळ सर्वमार्गीय रचना केली आहे. उत्पादनक्षमता वाढवण्याचे तसेच थेट ग्राहक संपादन व संवादाचे काम यांमुळे अधिक चांगले होते. एबीसीडी अॅपवर ६.४ दशलक्ष ग्राहकांची नोंद झाली आहे, तर उद्योग प्लसवर ३,६५८ कोटी रुपयांच्या एयूएमसह २.४ दशलक्ष नोंदण्या झाल्या आहेत.
आर्थिक वर्ष २२पासून आर्थिक वर्ष २५पर्यंत एबीसीएलने सर्व व्यवसायांची प्रसारक्षमता व बाजारपेठांतील वाटा यांना चालना देण्यासाठी सातत्यपूर्ण वाढ व कार्यात्मक उत्कृष्टता साध्य केली आहे. एनबीएफसी आणि हाउसिंग फायनान्स यांच्या कर्जपुस्तिकेत ३३ टक्के सीएजीआरने वाढ होत ती ६७,१८५ कोटी रुपयांवरून १,५७,४०४ कोटी रुपयांवर गेली आहे; आरोग्य व आयुर्विमा व्यवसायांचा एकूण प्रीमियम २३ टक्के सीएजीआरवर वाढून १३,८६७ कोटी रुपयांवरून २५,५७९ कोटी रुपयांवर गेला आहे. संपूर्ण एएमसी, आयुर्विमा व आरोग्य विमा यांमधील एकूण एयूएम ३,७०,६१८ कोटी रुपयांवरून वाढून ५,११,२६० कोटी रुपयांवर गेला आहे. एकत्रित पीएटीमध्ये वाढ होऊन तो १,५४५ कोटी रुपयांवरून ३,१४२ कोटी रुपये झाला आहे आणि एकत्रित उत्पन्न २३,४५६ कोटी रुपयांवरून वाढून ४७,३६९ कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कार्यात्मक नफा (करपूर्व नफा) दुपटीने वाढला आहे. आर्थिक वर्ष २२ मध्ये २,६६६ कोटी रुपयांवर असणारा कार्यात्मक नफा आर्थिक वर्ष २५ मध्ये ५,४७५ कोटी रुपयांवर गेला आहे.
