MAAC मॅनिफेस्टला २०२५ ने पुण्यातील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
पुणे : MAAC (माया अकॅडमी ऑफ अॅडवान्स्ड क्रिएटिव्हीटी) (MAAC (Maya Academy of Advanced Creativity)) या प्रमुख संस्था उच्चस्तरीय ३डी अॅनिमेशन, व्हीएफएक्स प्रशिक्षण, गेमिंग व मल्टीमीडियामधील अग्रणी, तसेच अॅप्टेक लिमिटेडच्या प्रशिक्षण ब्रँडने नुकतेच आपला प्रमुख कार्यक्रम एमएएसी मॅनिफेस्ट २०२५ ची सांगता केली. हे एव्हीजीसी-एक्सआर व्यावसायिकांसाठी व इच्छुकांसाठी माहिती आणि ट्रेण्ड्सची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ आहे. २२ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील जवाहरलाल मेमोरियल ऑडिटोरियममध्ये या माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये विद्यमान व माजी विद्यार्थी आणि प्रख्यात उद्योग तज्ञ प्रेरणा, अध्ययन व सर्जनशील देवाणघेवाणीप्रती समर्पित एक दिवसीय कार्यक्रमासाठी एकत्र आले.
या पर्वांमध्ये संपूर्ण भारतातील २,५०० हून अधिक विद्यार्थी व उद्योग प्रमुखांमध्ये सहभागी झाले. या यशस्वी पर्वांच्या संपन्न वारसाला अधिक दृढ करत यंदाचा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी क्रिएटर्सच्या विकासाला चालना देण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आला. MAAC मॅनिफेस्टने वर्गांच्या भिंतीपलीकडे संधी देण्याप्रती आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे, तसेच तरूणांना सर्जनशील उद्योगांमध्ये अर्थपूर्ण करिअर घडवण्यासाठी सुसज्ज करत आहे.
MAAC मॅनिफेस्ट २०२५ चे खास आकर्षण फिल्मसीजीआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद भानुशाली यांचे विशेष सत्र ठरले. ‘व्हिजन टू फ्रेम्स – द फिल्मसीजीआय सिग्नेचर’ शीर्षक असलेल्या त्यांच्या सादरीकरणाने MAAC विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टुडिओच्या अद्वितीय कथाकथन पद्धतींची आणि त्यांच्या सर्जनशील उत्कृष्टतेप्रती निरंतन प्रयत्नांची झलक दाखवली. उपस्थितांना सिनेमॅटिक अनुभवांची निर्मिती करण्यामधील प्रत्यक्ष अनुभव मिळाला, ज्यांनी भारतातील व परदेशातील चित्रपटनिर्मिती उद्योगामध्ये मापदंड स्थापित केले आहेत.
प्रमुख भाषणाव्यतिरिक्त या एकदिवसीय कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या उत्साही पॅनेल चर्चांचा देखील समावेश होता. भारतातील टॉप स्टुडिओ व प्रोडक्शन हाऊसेसमध्ये आता प्रसिद्ध व्यावसायिक असलेल्या MAACच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास व अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांना अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि डिजिटल डिझाइनमध्ये यशस्वी करिअर घडवण्यास मदत करण्यासाठी व्यावहारिक माहिती, ट्रेण्ड्स व आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. या सत्रांचा शिक्षण व उद्योगामधील तफावत दूर करण्याचा मनसुबा होता, ज्यामुळे उपस्थित सहभागी विद्यमान व कृतीशील पैलूंसह सुसज्ज झाले. MAAC मॅनिफेस्ट २०२५ मध्ये परस्परसंवादात्मक कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष अध्ययनासाठी संधींचा देखील समावेश होता,
MAAC मॅनिफेस्ट २०२५ मध्ये ६०० हून अधिक विद्यार्थी व इच्छुकांनी सहभाग घेतला. शहराच्या सर्जनशील इच्छुकांसाठी हा कार्यक्रम नेटवर्किंग व अध्ययनाचे हब ठरण्यासोबत MAACसाठी त्यांच्यासोबत संलग्न होण्याची आणि भावी टॅलेंटना निपुण करण्याप्रती त्यांची कटिबद्धता दाखवण्याची संधी देखील ठरला.
या कार्यक्रमाबाबत मत व्यक्त करत अॅप्टेक लिमिटेडच्या ग्लोबल रिटेलचे चीफ बिझनेस ऑफिसर आणि MAACचे ब्रँड कस्टडियन श्री. संदीप वेलिंग म्हणाले, “MAAC मॅनिफेस्ट विद्यमान व माजी विद्यार्थ्यांसाठी व तज्ञांसाठी एकत्र येण्याकरिता महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून कायम आहे. आमचा विश्वास आहे की, असे कार्यक्रम आजच्या तरूणांना कुशल आणि विकसित होत असलेल्या मीडिया व मनोरंजन उद्योगामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याप्रती सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अनुभव, नेटवर्किंग आणि मार्गदर्शन संधींनी सर्जनशील यशाच्या दिशेने परिवर्तनात्मक प्रवासासाठी पाया स्थापित केला आहे.”
पुण्यातील सहभागी केंद्रे एमजी रोड, जेएम रोड, कोथरूड, हडपसर, सातारा रोड आणि खराडी येथील आहेत. शैक्षणिक उत्कृष्टता व उद्योग-सुसज्जतेप्रती कटिबद्धतेसाठी प्रसिद्ध या केंद्रांनी सहयोग करत हा कार्यक्रम सादर केला, ज्यामधून भारतातील सर्जनशील क्षेत्राला आकार देण्याचा एमएएसीचा दृष्टिकोन दिसून येतो.
