Pride@Godrej 2025: प्रतीकात्मकतेपलीकडे LGBTQIA+ समुदायाच्या आवाजाला आणि व्यवसायांना बळकटी देणारा उपक्रम
मुंबई : या वर्षी Pride@Godrej उपक्रम गोदरेज इंडस्ट्रीज समूहात गेल्या दशकभर चाललेल्या सांस्कृतिक समावेशाच्या प्रयत्नांवर आधारलेला आहे. यामार्फत खर्या अर्थाने समलैंगिकतेच्या (queer) आवाजाला, उद्योजकतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.
समूहाने अलीकडेच गोदरेज वन या आपल्या मुख्यालयात एक रंगीबेरंगी प्राईड मार्च आयोजित केला होता. या मार्चचे नेतृत्व गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शाह यांनी केले आणि कंपनीतील अनेक वरिष्ठ पदाधिकारीही यात सहभागी झाले. हा मार्च LGBTQIA+ समुदायासोबत, भारत आणि जगभरातील गोदरेजच्या समलैंगिक कर्मचाऱ्यांसोबत आणि त्यांच्या समर्थकांसोबत ऐक्य दाखवणारा प्रभावी संदेश होता.
Pride@Godrej 2025 मधील एक मुख्य आकर्षण म्हणजे Queer Directions या नावाने सुरू करण्यात आलेले एक आगळे-वेगळे प्रकाशन उपक्रम. Westland Books सोबतच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश समलैंगिक समुदायाच्या आवाजांना आणि कथनांना व्यापक व्यासपीठ देणे हा आहे. कार्यक्रमाची सुरुवात Pitch Bazaar ने झाली, जिथे डझनभर अप्रकाशित समलैंगिक लेखकांनी प्रकाशक व मीडिया व्यावसायिकांशी थेट संवाद साधला. त्याच वेळी, Queer Bazaar मध्ये समलैंगिक उद्योजकांच्या लघु व्यवसायांमधील उत्पादने प्रदर्शित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना दृश्यमानता आणि आर्थिक संधी मिळाल्या.
या उत्सवाचा समारोप झुमकेवाली या नाटकाच्या मनमोहक सादरीकरणाने झाला. गोदरेज प्रॉपर्टिज लिमिटेडच्या पाठिंब्याने सादर करण्यात आलेले हे नाटक 1970 च्या दशकातील लेस्बियन पहिल्या प्रेमाची आणि आत्मशोधाची कहाणी सांगते. विविध भारतीय भाषांमध्ये सादर झालेल्या या नाटकाने कार्यक्रमातील समावेशकतेचा आत्मा प्रभावीपणे प्रकट केला आणि समलैंगिकत्व, भाषिक वैविध्य आणि भारतीय सांस्कृतिक विविधतेच्या संगमाचा उत्सव साजरा केला.
हा दिवसभर चाललेला उत्सव – संस्कृती, संवाद आणि समुदाय या घटकांचे सूक्ष्मतेने निवडलेल्या अनुभवांद्वारे एकत्रीकरण – हा खरोखरच एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय अनुभव ठरला.
“या उत्सवाबद्दल मला सर्वात जास्त उत्साह वाटतो तो म्हणजे आपण केवळ इंद्रधनुषी झेंड्यांपुरते मर्यादित न राहता खऱ्या संधी निर्माण केल्या आहेत,” असे गोदरेज डीईआय लॅबचे प्रमुख आणि क्युअरीस्तान या पुस्तकाचे लेखक परमेश शहाणी यांनी सांगितले. “जेव्हा समलैंगिक लेखक आत्मविश्वासाने आपली कथा उद्योगातील व्यावसायिकांना सादर करू शकतात, जेव्हा समलैंगिक उद्योजकांना त्यांचे उत्पादन सादर करण्याचे व्यासपीठ मिळते – तेव्हाच समावेश खऱ्या अर्थाने घडतो आहे, हे जाणवतं. आपण केवळ वैविध्याबद्दल बोलत नाही आहोत, तर समलैंगिक आवाजांना बहरण्याचे खरे मार्ग निर्माण करत आहोत.”
Westland Books चे प्रकाशक कार्तिका व्ही. के. म्हणाल्या, “Queer Directions या उपक्रमाची सुरूवात ही आमची ही श्रद्धा दर्शवते की उत्तम कथा उत्तम व्यासपीठांच्या लायक असतात. हे केवळ प्रकाशनाबद्दल नाही; हे या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी आहे की समलैंगिक समुदायाच्या खरीखुरी कथा भारतीय साहित्यात आपले योग्य स्थान मिळवतील – आणि अशा वाचकांपर्यंत पोहोचतील ज्यांना स्वतःला पुस्तकांत प्रतिबिंबित पाहणे आवश्यक आहे.”
जून महिन्यात गोदरेच समूहातील कंपन्या प्रतीकात्मक कृतींपलीकडे जाऊन Pride-केंद्रित उपक्रमांच्या मालिकेत सहभागी होत आहेत, जे खर्या अर्थाने सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पित आहेत.
गोदरेज प्रॉपर्टीज आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये प्राईड मंथ साजरा करत आहे — यात प्राईड मार्चेस, कथा सत्रे (storytelling sessions), सर्वसमावेशक कार्यशाळा आणि आर्ट कॉन्टेस्ट्स, भित्तीचित्र स्पर्धा यांसारख्या सर्जनशील उपक्रमांचा समावेश आहे. Godrej Capital Pride@Godrej One मध्ये समावेश वाढवण्यासाठी नुक्कड नाटक्स, ऑलीशिप पॅनेल चर्चा, LGBTQIA+ भरती मोहिमा आणि वेलनेस कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स हे QueeRising 2025 या जागतिक अभियानाचे नेतृत्व करत आहे, जे समलैंगिक ओळखीचा उत्सव संवाद, संबंध आणि प्रेरणादायी बदलाच्या माध्यमातून साजरा करत आहे.
गोदरेज केमिकल्स हे जनजागृती मोहिमा आणि LGBT+ संवेदनशीलता कार्यशाळांच्या माध्यमातून प्राईड मंथ साजारा करत आहे, तर गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड कार्यालयीन सहकार्य (workplace allyship) या विषयावर कर्मचारी कार्यशाळांचे आयोजन करत आहे.
यावर्षीही, Pride Flag आणि इतर समलैंगिक समुदायासाठी सकारात्मकता दर्शवणाऱ्या चिन्हांमुळे कर्मचारी आणि भेट देणाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संवाद घडून आले, जे गोदरेजच्या दृश्यमानता, संवाद आणि खऱ्या समावेशाबाबतच्या वाढत्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
