Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे ‘चॅम्पियन्स ऑफ आकाश’ कार्यक्रमात पुण्यातील NEET UG 2025 टॉपर्सचा गौरव

 पुणे : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) — देशातील आघाडीची परीक्षा तयारी संस्था — हिने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध करत विद्यार्थ्यांना आव्हानांवर मात करून समस्या सोडवणारे म्हणून घडवले आहे.
NEET UG 2025 परीक्षेच्या स्वरूपात व पद्धतीत मोठे बदल व अडचणी असूनही, AESL च्या विद्यार्थ्यांनी देशभरात अपूर्व कामगिरी करत प्रॉब्लेम-सॉल्विंग पद्धतीचा परिणाम दाखवून दिला आहे.
NEET UG 2025 च्या टॉप 10 यादीत आकाशच्या विद्यार्थ्यांनी 5 रँक्स पटकावल्या आहेत — AIR 2, 3, 5, 9 आणि 10. टॉप 100 मध्ये 35 विद्यार्थी आकाशचे आहेत आणि 11 आकाशीयन विद्यार्थ्यांनी राज्य टॉपर्स म्हणून यश मिळवलं आहे — मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, गोवा आणि दमण व दीव या राज्यांमध्ये.
AESL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक मेहरोत्रा म्हणाले:
“आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बदलत्या परिस्थितीत लवचिकता आणि निर्णयक्षमतेने वागण्याचे प्रशिक्षण देतो. म्हणूनच यंदाही आमच्याकडे अनेक रँकर्स आहेत. NEET 2025 चे स्वरूप केवळ वेगळं नव्हतं, तर कठीणसुद्धा होतं. पण स्वरूप काहीही असो, जेव्हा एखादा विद्यार्थी समस्या सोडवण्याची कौशल्ये आत्मसात करतो, तेव्हा तो कोणतीही परीक्षा सहज पार करू शकतो, हे आकाशीयन्सनी पुन्हा दाखवून दिलं आहे.”
आकाश पुणेच्या 3-वर्षीय क्लासरूम प्रोग्राममधील विद्यार्थी कृष्णांग जोशी यांनी NEET UG 2025 मध्ये AIR 3 मिळवत 720 पैकी 681 गुण प्राप्त केले आणि उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचा चॅम्पियन्स ऑफ आकाश कार्यक्रमात सत्कार करण्यात आला — ज्यामध्ये त्यांनी समस्या सोडवणाऱ्या, लक्ष केंद्रित ठेवणाऱ्या आणि तयारीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात करणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रतिनिधित्व केले.
कार्यक्रमात बोलताना AESL चे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसायप्रमुख डॉ. एच. आर. राव म्हणाले:
“कृष्णांगचं यश हे AESL साठी अभिमानाचा क्षण आहे. आकाशमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक समस्यासोडवणारा – म्हणजेच शांत, एकाग्र आणि समाधानाभिमुख बनवण्याचा प्रयत्न करतो. यंदाच्या परीक्षेत झालेल्या बदलांनंतरदेखील आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आमच्या मजबूत शैक्षणिक पाया, वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचा पुरावा आहे. आम्ही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो.”
कार्यक्रमात टॉपर्सनी NEET परीक्षेची तयारी कशी करावी, वेळेचे व तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, सातत्याने मोटिवेशन कसे ठेवावे, अशा महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांशी शेअर केल्या.
विद्यार्थ्यांना कृष्णांगच्या यशोगाथेवरून प्रेरणा घेता आली, अभ्यासात येणाऱ्या अडचणी कशा पार कराव्यात, वेळेचे नियोजन कसे करावे आणि Aakash कशी मदत करू शकते – हे थेट समजून घेण्याची संधी मिळाली. इंटरॲक्टिव्ह सेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली गेली आणि शंका दूर करण्यात आल्या.
NEET ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) कडून दरवर्षी घेतली जाते. ही परीक्षा भारतात वैद्यकीय (MBBS), दंतवैद्यकीय (BDS) आणि आयुष (BAMS, BHMS, BUMS इ.) अभ्यासक्रमांसाठी आणि परदेशात प्राथमिक वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता म्हणून आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading