बजाज फ्रीडम 125: जगण्याला नवी दिशा देणारी सीएनजी क्रांती
भारतातील मोठ्या शहरांमध्ये रोजच्या धावपळीच्या जीवनात, लाखो लोक दुचाकीवरच आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा वेळी बजाज ऑटो लिमिटेडने एक अशी बाइक सादर केली आहे, जी एका विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, उत्तम परफॉरमन्स देणारी आणि समृद्धीला चालना देणारी आहे. ‘बजाज फ्रीडम 125 सीएनजी’ ही जगातील पहिली सीएनजी बाइक असून डिलिव्हरी करणारे रायडर्स आणि गिग इकोनॉमी वर्कर्सचं (अशा व्यक्ती, ज्या पार्टटाइम, कॉन्ट्रॅक्ट किंवा अॅपवरून मिळणाऱ्या टास्क्सवर काम करून उत्पन्न कमावतात) आयुष्य बदलून टाकत आहे. कारण, ही बाइक त्यांना देत आहे कमाल मायलेज, विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत!
पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि दररोज 50 ते 250 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या शहरांतील रायडर्स यांच्या गरजा लक्षात घेता, बजाज फ्रीडम 125 मधील ड्यूल-फ्यूल प्रणाली (सीएनजी + पेट्रोल) हे एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारे तंत्रज्ञान ठरत आहे. इंधनावर होणाऱ्या खर्चाचा कमाल उपयोग होण्याच्या दृष्टीने ही बाइक तयार करण्यात आली आहे. इंधनाचा खर्च जवळपास निम्मा करून, ही बाइक भारतीय शहरांसाठी हरित आणि कमी प्रदूषण करणारे भविष्य घडवत आहे.
रिअल रायडर्स. रिअल सेव्हिंग्ज. रिअल इम्पॅक्ट.-अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, फ्रीडम 125 वापरणाऱ्या 54 मालकांपैकी तब्बल 45 रायडर्सनी सांगितले की त्यांच्या मागील बाइकच्या तुलनेने आता त्यांचा महिन्याचा इंधनखर्च 50 ते 60 टक्क्यांनी घटला आहे. अनेकांसाठी ही बचतीमुळे म्हणजे केवळ टिकून राहण्यासठीच नाही तर वेगाने प्रगती करण्यासाठी मदत होत आहे. “पूर्वी मी महिन्याला किमान रु.4,000 पेट्रोलवर खर्च करत होतो. फ्रीडम 125 घेतल्यापासून खर्च जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे भार बराच हलका झाला आहे. ही फक्त बाइक नाही, माझ्या कामाची खरी सोबती आहे,” असे पुण्यातील एका फूड डिलिव्हरी रायडरने सांगितले.
लांबच्या प्रवासासाठी आरामदायीपणा आणि आत्मविश्वास-दररोज 8 ते 10 तास ट्रॅफिकमध्ये बाइक चालवणाऱ्या गिग वर्कर्ससाठी आरामदायी राइड आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी ही अत्यावश्यक गरज असते. या बाबतीत फ्रीडम 125 अगदी समाधान देणारी ठरते. 66% हून अधिक रायडर्सनी या बाइकच्या सीट कम्फर्ट आणि राइडिंग पोझिशनला 5 पैकी 4 किंवा 5 गुण दिले. तसेच प्रत्यक्ष वापरामध्ये बाइकची कामगिरी विशेषतः कौतुकास्पद असल्याचे 26 रायडर्सनी नमूद केले.फ्रीडम 125 मधील ड्यूल-फ्यूल प्रणाली अतिशय स्मूथ असल्याचे रायडर्सचे मत आहे. पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये स्विच करताना पिकअप किंवा हँडलिंगमध्ये फारसा फरक जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले. 23 रायडर्सनी ट्रान्झिशन अगदी सहज असल्याचं आणि दोन्ही मोडमध्ये परफॉर्मन्स सातत्याने चांगला असल्याचे नमूद केले. पेट्रोल मोडमध्ये थोडा अधिक पिकअप मिळतो, हे काही रायडर्सना विशेष भावले. कारण त्यामुळे वेगवेगळ्या राइडिंग कंडिशन्समध्ये बाइक अधिक रिस्पॉन्सिव्ह वाटते.
किमान देखभाल, कमाल काम–गिग वर्कर्ससाठी बाइकचा मेंटेनन्स ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब असते. फ्रीडम 125 ला या बाबतीत चांगले प्रतिसाद मिळाले आहेत. 21 रायडर्सनी सांगितले की बाइक चालवताना त्यांना महिन्याला मेंटेनन्सचा वेगळा खर्च करावा लागत नाही. नियमित व खर्चिक सर्व्हिस न परवडणाऱ्यांसाठी ही बाइक गेमचेंजर ठरत आहे.एकूणच, परफॉर्मन्स, मायलेज आणि देखभालीची सुलभता यामुळे ही बाइक शहरातील रायडर्सना खूपच पसंतीस उतरते आहे.
बजाज ऑटो लिमिटेड : इनोव्हेटिव्ह वाहतूक उपाययोजना तयार करण्याचा वसा-फ्रीडम 125 ची परवडणारी किंमत, स्पोर्टी लूक आणि बजाज ऑटो लिमिटेडसारख्या विश्वासार्ह ब्रँडचा ट्रॅक रेकॉर्ड हे सगळे घटक ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक रायडर्सनी या बाइकला ‘एक परफेक्ट पॅकेज’ म्हटले आहे. ही बाइक त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट देते : उत्तम मायलेज, आरामदायी राइड, दमदार परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेची खात्री.
वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी आणि वाढती युझर कम्युनिटी -फ्रीडम 125 किती यशस्वी ठरते आहे, याचा सर्वात ठोस पुरावा म्हणजे 54 पैकी 51 मालकांनी ही बाइक इतरांना शिफारस करणार असल्याचे सांगितले. डिलिव्हरी पार्टनर्स आणि गिग वर्कर्सच्या नेटवर्कमध्ये बातम्या झपाट्याने पसरतात, फ्रीडम 125 ने उपयोगी, विशिष्ट उद्देशाने रायडिंग करणाऱ्या युझर्सचा एकनिष्ठ फॅन बेस तयार केला आहे.फ्रीडम 125 च्या लाँचद्वारे बजाज ऑटोने शाश्वत वाहतुकीच्या दिशेने घेतलेले आघाडीचं पाऊलही अधोरेखित होते. पर्यावरणपूरक आणि सुलभ वाहतुकीचे पर्याय शोधणाऱ्या भारतासाठी ही सीएनजीवर चालणारी बाइक एक वास्तववादी उपाय ठरत आहे. या बाइकच्या माध्यमातून पॉवरच्या बाबतीत तडजोड होत नाही आणि खर्चही वाढत नाही.
खऱ्या अर्थाने फ्रीडम-मायलेज असो, पर्यावरणपूरक वापर असो किंवा लांब पल्ल्याची आरामदायी राईड — बजाज फ्रीडम ही बाइक अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की रायडर्सना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्वातंत्र्याचा खरा अनुभव घेता येतो. या बाइकमुळे भारतातील वर्किंग क्लासला स्मार्ट राइड करता येते, पैशाची बचत करता येते आणि अधिक सन्मानाने व आत्मविश्वासाने काम करता येत आहे.
