Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदानासाठी नोव्हेंबर – डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार

मुंबई: प्रतिनिधी

न्यायालयाच्या आदेशानुसार दीर्घ काळापासून लांबलेल्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. मात्र, या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचे वेळापत्रक नगररचना विभागाने जाहीर केले असून त्यानुसार प्रत्यक्ष मतदानासाठी नोव्हेंबर अखेर अथवा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नगररचना विभागाच्या वेळापत्रकानुसार राज्यातील अ, ब आणि क प्रवर्गातील प्रभागांची रचना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत  निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ड वर्ग महापालिकाचे प्रभाग 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निश्चित करण्यात येणार आहेत.

प्रभाग निश्चिती झाल्यानंतर या प्रभागांमध्ये आरक्षणे लागू करणे आणि त्यानंतर प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे, हे दोन टप्पे पार पडणार आहेत. या कामांसाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून अर्थातच महापालिका निवडणुकांचे मतदान नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर च्या सुरुवातीला पार पडेल, असे दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading