Wednesday, June 10, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत

अहमदाबाद: वृत्तसंस्था

येथील मेघानीनगर येथे विमान इमारतीला धडकून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याबरोबरच अपघातग्रस्त इमारतीच्या दुरुस्ती आणि डागडुजीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून लंडनला निघालेल्या विमानाने केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीला धडक दिली. ही इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाची आहे. या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवासी, सेवक वर्ग, अधिकारी अशा 241 जणांचा मृत्यू झाला. वसतिगृहातील 20 शिकवू डॉक्टरांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला. विमानातून प्रवास करणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील मरण पावले.

टाटाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading