Wednesday, June 10, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

इस्रायलच्या वायुदलाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून तेहरानला केले लक्ष्य

तेल अवीव: वृत्तसंस्था

इराणकडून अण्वस्त्र विकसित करण्याचे प्रयत्न थांबावेत आणि त्यांची सैन्यशक्ती क्षीण व्हावी, या उद्देशाने इस्रायलने इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे. इस्रायलच्या वायुदलाने अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून तेहरानला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात रिबोल्यूशनरी गार्डसच्या प्रमुखासह प्रमुख अणुअस्त्रशास्त्रज्ञ आणि इराणी सैन्य दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलच्या या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा दावा इराणच्या शासकीय माध्यमांनी केला आहे. या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी भीषण आगी लागल्या आहेत. पडलेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली अनेक वाहने अडकून पडली आहेत. तेहरानच्या अनेक गल्ल्यांमध्ये मलब्याचे ढिगारे साठले आहेत.

इस्रायलने परस्पर इराणवर हल्ला केला असून त्यात अमेरिका सहभागी नाही, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हात वर केले आहेत. इराण मे अनू कार्यक्रम थांबवावा, यासाठी संघर्ष करण्याऐवजी वाटाघाटीतून मार्ग काढण्यावर अमेरिका ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या आठवड्याच्या अखेरीस ओमानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्या चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच इजरायलने केलेल्या या हल्ल्यामुळे ती चर्चा पार पडणार का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading