Wednesday, May 20, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

अहमदाबादहून 242 प्रवाशांना घेऊन लंडनला निघालेले विमान कोसळले

अहमदाबाद: वृत्तसंस्था 

येथील विमानतळावरून उड्डाण करून केवळ १५ किलोमीटर अंतरावरच एअर इंडियाचे प्रवासी विमान नागरी परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर परिसरात  आगीचे भले मोठे लोळ पसरल्याचे दिसून आले. विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच जीवितहानीचा आकडा देखील समजलेला नाही. 

बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाने 242 प्रवाशांना घेऊन अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाण्यासाठी उड्डाण केले. उड्डाण केल्यावर काही काळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमान कोसळण्यापूर्अ आसमंत काळ्या रंगाच्या धुराने भरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. विमानातून प्रचंड ज्वाला बाहेर येऊ लागल्या. नागरी भागात हे विमान पडल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असल्याची शक्यता आहे. 

विमान अपघातग्रस्त होतात अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान देखील बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading