Wednesday, May 20, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

तब्बल चार हजार किलोमीटर आत घुसून युक्रेनने रशियाचे हवाई तळ केले उध्वस्त

मॉस्को: वृत्तसंस्था

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणे सुरू होण्यापूर्वीच युक्रेनने रशियात खोलवर ड्रोन हल्ले केले आहेत. रशियामध्ये तब्बल चार हजार किलोमीटर आत घुसून युक्रेनने रशियाचे हवाई तळ उध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात रशियाची तब्बल 40 लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

या मोहिमेचे ‘स्पायडर वेब’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरसह स्पायडर वेब हल्ल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मानव रहित शस्त्रांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

भारताने दीर्घ काळापासून हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि हवाई सामाजिक शक्ती विकसित करण्यावर भर दिला आहे. मात्र युक्रेंच्या रशियामधील स्पायडर वेब या हल्ल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणि खोलवर जाऊन लक्ष्यभेद करणाऱ्या शस्त्र प्रणालीची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.

भविष्यकाळात मानव रहित हवाई वाहनांची भूमिका युद्धभूमीवर सर्वात महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे भारताने अशी यंत्रणा विकसित करणे आवश्यक ठरले आहे. त्याचप्रमाणे रशियासारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या देशाची हवाई संरक्षण यंत्रणा देखील युक्रेनच्या ड्रोनला थोपवू शकली नाही. यावरून अभेद्य हवाई संरक्षण यंत्रणेची आवश्यकताही दिसून आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading