तुळजाभवानी मंदिरात भाविकांना चितळे बंधूचा प्रसाद
धाराशिव: प्रतिनिधी
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून मोतीचूर लाडू देण्यात येणार आहे. हा प्रसाद पुणे येथील सुप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले हे तयार करणार असून त्यासाठी देवस्थान आणि चितळे बंधू यांच्यात करार झाला असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले.
बालाजी देवस्थानच्या धर्तीवर तुळजाभवानी देवस्थानातही भक्तांना प्रसाद म्हणून लाडू दिला जाणार आहे. या लाडूची पाककृती देवस्थानचे विश्वस्त आणि पुजारी यांच्या सूचनानुसार निश्चित केली जाणार आहे. हे लाडू चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून तयार करून घेतले जाणार आहेत.
देवस्थान प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून त्याबद्दल भाविक वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
