स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे ‘स्टार फ्लेक्सी’ योजनेसह ‘इसेंशियल’, ‘प्रेफर्ड’ आणि ‘सिक्युअर’ या व्हेरिएंट्समध्ये प्रमुख उत्पादन सुपर स्टारचा विस्तार
चेन्नई : भारतातील सर्वात मोठी रिटेल हेल्थ इन्शुरन्स पुरवठादार स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने आज त्यांचे प्रमुख उत्पादन ‘सुपर स्टार’च्या विस्तारस्वरूपात ‘स्टार फ्लेक्सी’ हा मल्टी-रायडर सादर केल्याची घोषणा केली. स्टार फ्लेक्सी हा एक वैशिष्ट्यपूर्ण मल्टी-रायडर असून सुपर स्टार या महत्वपूर्ण आरोग्य योजनेमध्ये अधिक लवचिकता आणि वैयक्तिकरणासह नवनवीन फायदे जोडतो. याच्या माध्यमातून स्टार हेल्थने तीन नवीन व्हेरिएंट्स ‘इसेंशियल’, ‘प्रेफर्ड’ आणि ‘सिक्युअर’ सादर केले आहेत. ते ग्राहकांना त्यांच्या आरोग्य विम्यावर अधिक निवड आणि नियंत्रण देतात.
लवचिक, वैयक्तिक आणि परवडणाऱ्या आरोग्य विमा उपाययोजनांची वाढती गरज लक्षात घेऊन स्टार फ्लेक्सी डिझाइन करण्यात आले आहे. ही योजना ग्रामीण व निमशहरी भागांतील व्यक्तींपासून महानगरांतील अधिक व्यापक आणि प्रीमियम कव्हरेज पसंत करणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्व श्रेणींच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.
सुपर स्टारने ग्राहकांमध्ये लवकरच मजबूत नावलौकिक मिळवला असून ही देशातील सर्वाधिक पसंतीच्या आरोग्य विमा योजनांपैकी एक बनली आहे. 1.6 लाखांहून अधिक विमा योजनांच्या विक्रीतून केवळ सात महिन्यांत 580 कोटी रु. चे उत्पन्न मिळवत, सुपर स्टारने विविध ग्राहक श्रेणींमध्ये चांगला प्रतिसाद मिळवला आहे. सुपर स्टारच्या यशामुळे अधिक लवचिकता, वैयक्तिकरण आणि विशिष्ट गरजांसाठी डिझाइन केलेले कव्हरेज देणाऱ्या आरोग्य योजनांमध्ये वाढता रस असल्याचे दिसून येत आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय म्हणाले, “आमच्या ‘सुपर स्टार’ प्रॉडक्टच्या यशामुळे भारतभर लवचिक, परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा उपाययोजनांची वाढती मागणी अधोरेखित झाली आहे. ‘इसेंशियल’, ‘प्रेफर्ड’ आणि ‘सिक्युअर’ या तीन विशेषतः तयार केलेल्या आरोग्य विमा पॅकेजेसच्या सुरूवातीनंतर, आम्ही लहान गावांपासून ते मेट्रो शहरांपर्यंत दर्जेदार आरोग्य विमा सेवा पोहचवण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळकट करत आहोत. ही नवीन क्युरेटेड पॅकेजेस व्यक्ती आणि कुटुंबांना सक्षम बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, जेणेकरून ते त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकतील आणि त्यांना हवी असलेली सुरक्षितता आणि मानसिक शांती मिळू शकेल. हे करताना सर्वसमावेशक कव्हरेज सर्वांच्या आवाक्यात राहील याची खात्री दिली गेली आहे.”
प्रत्येक नवीन पॅकेज सुपर स्टारच्या विश्वसनीय कव्हरेजला स्टार फ्लेक्सीच्या लवचिकता आणि नाविन्यपूर्णतेसोबत एकत्र आणते. हे व्हेरिएंट्स लहान शहरांमधील छोट्या कुटुंबांपासून ते महानगरांतील अनुभवी खरेदीदारांपर्यंत विस्तृत ग्राहकवर्गासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ही पॅकेजेस विविध प्राधान्यक्रम आणि बजेटनुसार अर्थपूर्ण आरोग्य विमा पर्याय देतात.
विशेषतः तयार केलेली ही तीन पॅकेजेस —‘इसेंशियल’, ‘प्रेफर्ड’ आणि ‘सिक्युअर’ ही विशिष्ट आरोग्य गरजांसाठी रचना केलेली आहेत. प्रत्येक व्हेरिएंट वेगवेगळ्या ग्राहक गटाला सेवा पुरवतो आणि त्यांच्या आरोग्य आणि आर्थिक प्रवासाच्या टप्प्यावर आधारित पर्याय देतो.
इसेंशियल
हा व्हेरिएंट टियर 2 आणि टियर 3 बाजारपेठेतील पहिल्यांदाच पॉलिसी घेणाऱ्यांसाठी आणि मूल्यजाणीव असलेल्या ग्राहकांसाठी आदर्श आहे. हा उपलब्धता आणि परवडणाऱ्या कव्हरेजवर लक्ष केंद्रित करतो, मूलभूत आरोग्य गरजांसाठी संतुलित संरक्षण प्रदान करतो.
मुख्य वैशिष्ट्ये:
- 5 लाख रु. पासून सुरू होणारा सम इन्शुअर्ड
- सिंगल प्रायव्हेट रूम कव्हरेज
- डे केअर उपचार, आयुष, अवयव दान करणाऱ्याचे उपचार आणि होम केअर उपचार
- सम इन्शुअर्डचे अमर्याद पुनर्संचय
- प्रीमियम माफीचा लाभ आणि टेलीकन्सल्टेशन अॅक्सेस
- STAR वेलनेस प्रोग्राम सहभाग आणि क्युम्युलेटिव (एकत्रित) बोनस
- ऑप्शनल अॅड-ऑन्स: कंझ्युमेबल्स आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय चाचणी
प्रेफर्ड
हा व्हेरिएंट शहरी कुटुंबे आणि दीर्घकालीन मूल्य शोधणाऱ्या व्यवसायिकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. तो मेट्रो आणि टियर 1 ग्राहकांसाठी अधिक व्यापक संरक्षण आणि ठोस परतावा देणारे फायदे पुरवतो.
मुख्य वैशिष्ट्ये:
o रूम भाड्यावर कोणतीही मर्यादा नाही
o 5 लाख रु. पर्यंत एअर अॅम्ब्युलन्स कव्हर
o हेल्थ बूस्टर: सात क्लेम-फ्री वर्षांनंतर बेस सम इन्शुअर्डचा 100%
o प्रीमियम रिटर्न: पाच क्लेम-फ्री वर्षांनंतर पहिल्या वर्षाचा प्रीमियम परत
o सम इन्शुअर्ड मल्टिप्लायर: दीर्घकालीन लवचिकतेसाठी
o अतिरिक्त कव्हरेज: दातांची स्वच्छता, घरगुती नर्सिंग, वैद्यकीय उपकरणे यासाठी अतिरिक्त संरक्षण
सिक्युअर
हा व्हेरिएंट अनुभवी, जुन्याजाणत्या पॉलिसीधारकांसाठी तयार करण्यात आला आहे जे मजबूत संरक्षण आणि स्मार्ट व्हॅल्यूला प्राधान्य देतात. ज्यांना अनावश्यक वैशिष्ट्यांसाठी जास्त पैसे न देता व्यापक संरक्षण हवे असते अशा अनुभवी ग्राहकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुख्य वैशिष्ट्ये:
o रूम भाड्यावर कोणतीही मर्यादा नाही
o 5 लाख रु. पर्यंत एअर अॅम्ब्युलन्स कव्हर
o सम इन्शुअर्डचे अमर्याद पुनर्संचय
o अमर्यादित लॉयल्टी बोनस: प्रत्येक नूतनीकरणावर क्लेम असो वा नसो, सम इन्शुअर्डचा 100% वाढ
o STAR वेलनेस प्रोग्राममध्ये प्रवेश आणि क्लेम-फ्री वर मिळणाऱ्या सवलती
o ऑप्शनल अॅड-ऑन्सद्वारे वाढीव संरक्षण
स्टार फ्लेक्सीचे सादरीकरण हे सुपर स्टार प्रॉडक्टचा अधिक वैयक्तिकृत आणि लवचिक पर्याय म्हणून विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तीन विशिष्ट व्हेरिएंट्स सादर करून, स्टार हेल्थ विविध जीवन टप्पे आणि भौगोलिक क्षेत्रांतील ग्राहकांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेत आहे. परवडणारा प्रीमियम असो, संतुलित फायदे असोत किंवा सर्वसमावेशक संरक्षण — ही नवीन पॅकेजेस ग्राहकांच्या जीवनशैली, कामकाज आणि आरोग्य नियोजनाशी सुसंगत अशी अर्थपूर्ण कव्हरेज देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत.
