Thursday, October 29, 2026
BusinessLatest News

ॲक्सिस बँकेने प्रोजेक्ट ‘नमन’ला पाठिंबा देण्यासाठी भारतीय लष्कर आणि कॉमन सर्व्हिस सेंटर ई-गव्हर्नन्स यांच्याशी केला सामंजस्य करार

नवी दिल्ली : भारतातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने भारतीय लष्कर आणि CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यासोबत प्रोजेक्ट “नमन”ला पाठिंबा देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा प्रकल्प लष्करी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी समर्पित आहे. हा करार लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, डीजी डीसी&डब्ल्यू; ब्रिगेडियर मनदीप सिंग, एसएम, ब्रिग डीआईएव्ही; श्री मोहित जैन, एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट – भारत बैंकिंग, एक्सिस बैंक आणि श्री हरीश ओबेरॉय, वाइस प्रेसिडेंट, सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या साक्षीने करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत ॲक्सिस बँक साहाय्यता केंद्रे स्थापन करण्यात मदत करेल, जे लष्करी निवृत्त कर्मचारी, युद्धविधवा आणि नातेवाईक (Next-of Kin) यांना आवश्यक सेवा, कल्याणकारी योजना व निवृत्तीवेतनासंदर्भातील मदत सहजतेने मिळवून देण्यासाठी कार्य करतील.

2023 मध्ये सुरू झालेला प्रोजेक्ट “नमन” हा संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या SPARSH (System for Pension Administration – Raksha) या डिजिटल निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्यावर केंद्रित आहे. या प्रणालीमुळे संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. या भागीदारीअंतर्गत CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) १३ राज्यांतील २५ DIAV (Directorate of Indian Army Veterans) केंद्रांमध्ये स्थापन करण्यात येणार आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, राजस्थान इत्यादींचा समावेश आहे. ही साहाय्यता केंद्रे विविध प्रश्न व अडचणी हाताळण्यास सज्ज असतील आणि देशासाठी सेवा केलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना सर्वांगीण मदत पुरवतील.

प्रत्येक CSC केंद्राचे संचालन स्थानिक लष्करी प्राधिकरण (Local Military Authorities -LMA) द्वारे निवडलेले लष्करी निवृत्त कर्मचारी किंवा नातेवाईक (Next-of-Kin – NOK) यांच्याकडून केले जाईल. CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड हे VLEs (Village Level Entrepreneurs) म्हणून काम करणाऱ्यांना नोंदणी करून त्यांना लष्करी निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची सेवा करण्यासाठी प्रशिक्षण देईल. ही केंद्रे SPARSH प्रणालीअंतर्गत निवृत्तीवेतन सेवा, शासन-ते-नागरिक (Government-to-Citizen – G2C) सेवा आणि व्यवसाय-ते-ग्राहक (Business-to-Consumer – B2C) सेवा यासाठी एक खिडकी व्यासपीठ (single-window platform) म्हणून कार्य करतील.

या भागीदारीबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर श्री. मुनिश शारदा म्हणाले, “ॲक्सिस बँकेमध्ये, आम्हाला भारतीय लष्कर आणि CSC ईगव्हर्नन्ससोबत प्रोजेक्ट नमनला पाठिंबा देण्यासाठी भागीदार होण्याचा मोठा सन्मान वाटतो. ही भागीदारी आमची राष्ट्रनिर्माणासाठीची निष्ठा आणि देशासाठी निःस्वार्थपणे सेवा केलेल्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांप्रती असलेले आमचे कृतज्ञतेचे भाव व्यक्त करते. आम्हाला विश्वास आहे की, ही भागीदारी लष्करी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अधिक समावेशक व सहायक वातावरण निर्माण करण्यात मदत करेल.”

या प्रसंगी बोलताना ब्रिगेडियर मनदीप सिंग, एसएम, ब्रिग डीआईएव्ही म्हणाले, “ही भागीदारी आमच्या निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठीच्या यंत्रणेला बळकटी देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ॲक्सिस बँक आणि CSC ई-गव्हर्नन्स सहकार्याने, देशासाठी सेवा केलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक व अखंड सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) संजय राकेश म्हणाले, “CSC मध्ये प्रोजेक्ट नमनमध्ये योगदान देताना आम्हाला अभिमान वाटतो. हा प्रकल्प लष्करी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना डिजिटल समावेशनाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या आमच्या सामाईक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. DIAV केंद्रांवर साहाय्यता केंद्रे स्थापन करून, आम्ही देशाच्या अत्यंत दूरच्या भागांपर्यंतही आवश्यक निवृत्तीवेतन व कल्याणकारी सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत.”

प्रोजेक्ट नमनअंतर्गत ही भागीदारी कृतज्ञता आणि प्रगतीचे प्रतीक ठरते, जी देशासाठी अभिमान व शौर्याने सेवा केलेल्या व्यक्तींना आवश्यक आर्थिक सेवा अधिक सुलभतेने आणि जवळून उपलब्ध करून देते.

Leave a Reply