Sunday, May 31, 2026
BusinessLatest News

गृन्डफॉस सीयूई 120 (CUE 120) तर्फे भारतासाठी भारतात तयार केलेल्या ऊर्जा कार्यक्षम पंप तंत्रज्ञानासाठी नवीन मापदंड प्रस्थापित

पुणे : पंपिंग सुविधा पुरवणारी एक जागतिक पुरवठादार कंपनी गृन्डफॉसने भारतीय बाजारपेठेसाठी भारतात विकसित केलेले सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर केले आहे. या नव्या उत्पादनाचा उद्देश पंपच्या कार्यक्षमतेवर अधिक अचूक नियंत्रण ठेवणे आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आहे.

संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की सध्या सुमारे 70% व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह्ज (VFDs) फॅक्टरीच्या डीफॉल्ट सेटिंग्सवर कार्यरत आहेत. त्या बर्‍याचदा त्यांच्या विशिष्ट अनुप्रयोगांसाठी अनुकूल नसतात. अशा प्रकारच्या अनुकूल नसण्याच्या अभावामुळे ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक ऊर्जा वापर आणि कामकाज खर्च वाढतो. परिणामी, अनेक प्रणाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि कार्यक्षमता वाढविण्यात त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यात अपयशी ठरतात.

सीयूई 120 हे उत्पादन या समस्यांवर उपाय म्हणून डिझाइन करण्यात आले असून, हे भारतीय बाजारपेठेसाठी विशिष्ट सानुकूलित उपाय सादर करते. त्यामुळे अधिक अचूक नियंत्रण व स्थानिक गरजांनुसार ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा शक्य होते.

गृन्डफॉस सीयूई 120 सादर करताना कंट्री प्रेसिडेंट इंडिया उषा सुब्रम्हण्यम् म्हणाल्या, “गृन्डफॉस सीयूई 120 हे केवळ एक उत्पादन नाही तर नवकल्पना आणि शाश्वततेसाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतासाठी डिझाइन केलेले हे उत्पादन उद्योग, इमारती आणि समुदायांना अधिक स्मार्ट, ऊर्जा कार्यक्षम पंपिंग सोल्यूशन्स देऊन एक हरित भविष्य शक्य करत आहे. आंतरविभागीय सहकार्याच्या माध्यमातून साध्य झालेले आमचे हे स्थानिक पातळीवर विकसित केलेले पहिले उत्पादन असल्यामुळे हे सादरीकरण गृन्डफॉस इंडियासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे.”

22 kW पर्यंतच्या मोटर्ससाठी ऑप्टिमाइझ केलेले सीयूई 120 कोणत्याही गृन्डफॉस पंप रेंजसोबत सहजपणे एकत्रित होते आणि उत्कृष्ट कार्यक्षमता व परिणामकारकता देते. हे ऊर्जा वापर सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि विश्वसनीयता वाढवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. त्यायोगे भारतातील उद्योग, महापालिका आणि व्यवसायांना अधिक सुसंगत आणि शाश्वत कार्यप्रणाली प्राप्त होते.

इंडो विभागाचे विक्री विभाग प्रमुख शंकर राजाराम म्हणाले, “भारतीय बाजारपेठेसाठी एक परवडणारे आणि सहज उपलब्ध ड्राइव्ह तयार करणे याकरता गृन्डफॉस सीयूई 120 ही एक स्पष्ट दृष्टिकोनातून तयार झालेली कल्पना आहे. सखोल बाजार विश्लेषणाद्वारे आम्ही जोडणी करायला सोपा, वापरायला आणि नियंत्रण ठेवायला सहज सुलभ असा ड्राइव्ह तयार करण्याची गरज ओळखली. कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा हा केंद्रबिंदू ठेवून डिझाइन केलेले सीयूई 120 ग्राहकांना अखंड कार्यक्षमतेसह सक्षम करते. त्यायोगे शाश्वत पंपिंग शक्य होते.”

अस्तित्वात असलेल्या पंप्स आणि प्रणालींच्या कार्यक्षमतेत अधिकतम सुधारणा करून, सीयूई 120 अधिक स्मार्ट कामगिरी घडवून आणतो आणि पर्यावरणावरील प्रभाव कमी करतो. भविष्यात kW क्षमतेत वाढ करण्याच्या योजनांसह, गृन्डफॉस कार्यक्षमतेच्या मर्यादा अधिक विस्तारित करत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजांसाठी अधिक लवचिकता व विस्तार सुनिश्चित होतो.

गृन्डफॉस सर्वांना या पंप तंत्रज्ञानातील परिवर्तनशील झेप अनुभवण्याचे आणि शाश्वत भविष्यासाठी त्यांच्यासोबत वाटचाल करण्याचे आवाहन करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading