किर्लोस्कर ऑईल इंजिन्सने सादर केला जगातील सर्वात लहान 1000 kVA जनरेटर
पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडने Optiprime Dual Core 1000 kVA जनरेटरचे अनावरण केले असून जगातील सर्वात लहान जनरेटर आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी डिझाइन करण्यात आलेला हा आटोपशीर आणि कार्यक्षम जनरेटर उच्च कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचे मिश्रण आहे आणि किर्लोस्करच्या जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण, हरित ऊर्जा उपायसुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. (Kirloskar Oil Engines launches world’s smallest 1000 kVA generator)
घरांमध्ये आणि लघुउद्योगांमध्ये वापरासाठी उच्च कार्यक्षमतेची नवीन जनरेटर श्रेणी असलेली Sentinel Series देखील यावेळी सादर करण्यात आली. या दोन्ही उत्पादन प्रकारांतून किर्लोस्करचा ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानावरील समर्पित भाव आणि जागतिक प्रदूषण उत्सर्जन मानकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याची वचनबद्धता दिसून येते.
कीर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमास कंपनीच्या ठाम पाठिंब्याबाबत बोलताना भारत आणि मध्यपूर्व यांच्यातील संबंध दृढ करण्यामध्ये किर्लोस्करच्या भूमिकेवर भर दिला. स्मार्ट ऊर्जा उपायांद्वारे शाश्वत विकासाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
किर्लोस्करकडून इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, नॅचरल गॅस, बायोगॅस आणि हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांवर चालणारे इंजिन्सही उपलब्ध आहेत. यात ड्युअल-फ्युएल आणि फ्लेक्स-फ्युएल उपायांचा समावेश असून ते उद्योगांना त्यांच्या कार्बन उत्सर्जनाचा ठसा कमी करण्यात मदत करतात.
सतत बदलणाऱ्या ऊर्जा गरजांना कार्यक्षम आणि जबाबदारीने प्रतिसाद देत आंतरराष्ट्रीय पातळीवरील मजबूत स्थान आणि विस्तृत वितरण नेटवर्कसह, किर्लोस्कर हे अत्याधुनिक उपाय जागतिक बाजारापेठांमध्ये पोहोचवण्यासाठी सज्ज आहे.
