शाळकरी विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी क्रीडा साहित्य पुरविण्यासाठी सूर्या हॉस्पिटल्स आणि मुक्कामार यांच्यात करार
मुंबई : शालेय शिक्षण घेणा-या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना स्व संरक्षणात सक्षम करणे यासाठी कार्य करणा-या मुक्कामार संस्थेने तिच्या “मुक्कामार गर्ल्स” या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सूर्या हॉस्पिटल्स क्रीडासाहित्य पुरविणार असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या पोयसर हिंदी 2 या शाळेच्या तसेच मापखण इंग्लिश हाय स्कूल च्या विद्यार्थिनींना या क्रीडासाहित्याचा लाभ मिळेल. या दोन्ही शाळांनी मुक्कामार च्या मुलींचे स्वास्थ्य आणि साक्षमीकरण यासाठीच्या विविध उपक्रमांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.
” या क्रीडा साहित्यामुळे अधिकाधिक मुलींना शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रातील विविध प्रकारात सहभागी होण्यासाठी उत्तेजन मिळेल, त्यातून त्यांचे आरोग्य सुधारेल आणि आपल्या अंगभूत क्षमतेची जाणीव होऊन ती वापरण्याची प्रेरणा मिळेल ,” असे प्रतिपादन मुक्कामार च्या संस्थापिका इशिता शर्मा यांनी केले.
“मुलींना योगी ते क्रीडासाहित्य उपलब्ध झाले तर त्यांचा खेळांमधील सहभाग वाढेल आणि त्यातूनच आमचे किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास, धाडस आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याची ताकद निर्माण करून त्यांना हिंसेचे दडपण न बाळगता आपल्या जीवनाचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य मिळविण्याचा मार्ग दाखविण्याचे उद्दिष्ट सफल होईल,” असे त्या म्हणाल्या.
सूर्या हॉस्पिटल्स चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. भूपेंद्र अवस्थी म्हणाले , ” मुलांचे शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही जोपासले पाहिजे अशी सूर्य हॉस्पिटल्स ची धारणा आहे. मुक्कामार बरोबर केलेला हा करार आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास या आमच्या धारणेशी अगदी पूर्ण सुसंगत आहे. मुलींसाठी आवश्यक क्रीडासाहित्य उपलब्ध करून आम्ही त्यांच्या सक्षमीकरणाला हातभार लावू शकू अशी आशा आहे. मुलींच्या शारीरिक शिक्षणासाठी आणि स्वसंरक्षणा साठी गुंतवणूक ही आमची उद्याच्या न्याय्य आणि सुरक्षित समाज रचनेत केलेली गुंतवणूक आहे.”
डॉ. भुवन डोमेट्टी (विभागीय संचालक – सूर्या हॉस्पिटल्स ) म्हणाले, “ महिला सबळीकरणाचा प्रवास लहान वयातच सुरू होतो असे आम्हाला वाटते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे विविध उपक्रम संपन्न होत असताना केलेले हे क्रीडासाहित्याचे योगदान आमचा कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण महिलांची पुढची पिढी तयार करण्यावर असलेला विश्वास अधोरेखित करते. आयुष्यभर उपयुक्त ठरणारी कौशल्ये आत्मसात करू इच्छिणा-या या मुलींना साह्य करणे हा आमचा बहुमान आहे. पुढच्या काही वर्षात त्यांची प्रगती आणि यश उंचवताना पाहण्याची आम्हाला आशा आहे. ”
मुक्कामार गर्ल्स हा उपक्रम तीन वर्षे चालणार आहे. आत्मविश्वास, धैर्य आणि संकटातून बाहेर पडण्याची क्षमता विकसित करणे आणि ज्ञान, कौशल्ये तसेच हिंसाचाराचा सामना करण्याची मनोवृत्ती निर्माण करणे या उद्दिष्टांवर हा उपक्रम आधारित आहे. या उपक्रमाचा वार्षिक सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपास साजरा होतो आणि अशा वेळी ही देणगी जाहीर होत आहे. या सोहळ्यात मुक्कामार गर्ल्स त्यांनी आत्मसात केलेल्या क्षमतांचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांसमोर सादर करतात .
