Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

वर्गापलीकडे देखील शिक्षण – फिजिक्‍सवालाचे क्‍यूरिअस ज्‍युनिअर विद्यार्थ्‍यांना शिक्षणामध्‍ये साह्य करते

 

पीडब्‍ल्‍यूचा क्‍यूरिअस ज्‍युनिअर कौशल्‍य संबंधित एनईपी-संलग्‍न अभ्‍यासक्रमाला एकत्र करत विद्यार्थ्‍यांना लाइव्‍ह (ऑनलाइन) शिक्षण घेण्‍यास मदत करण्‍याचा प्रयत्‍न करतो. इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला क्‍यूरिअस ज्‍युनिअर अध्‍ययनाप्रती संरचित दृष्टिकोन देतो, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना त्‍यांचा शैक्षणिक पाया भक्‍कम करण्‍यास मदत होते, तसेच त्‍यांना आवश्‍यक जीवन कौशल्‍ये विकसित करण्‍यास देखील मदत करत आहे. हा प्‍लॅटफॉर्म विज्ञान, इंग्रजी, गणित व सामाजिक शास्‍त्रामधील परस्‍परसंवादात्‍मक प्रोग्राम्‍स देतो, जे विद्यार्थ्‍यांच्‍या गरजांनुसार डिझाइन करण्‍यात आले आहेत.

ऑनलाइन शैक्षणिक प्रोग्राम म्‍हणून या प्‍लॅटफॉर्मचा इंटरअॅक्टिव्‍ह लाइव्‍ह क्‍लासेस् आणि सर्वसमावेशक टूल्‍सच्‍या माध्‍यमातून अध्‍ययनामधील तफावतींना दूर करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना सर्वोत्तम अध्‍ययन मिळेल. विद्यार्थ्‍यांना वैयक्तिकृत पाठिंबा देण्‍यात येतो आणि त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगतीवर देखरेख ठेवली जाते. विद्यार्थ्‍यांकडे बारकाईने लक्ष देण्‍यासाठी शिक्षक विविध प्रकारच्‍या परस्‍परसंवादात्‍मक घटकांचा उपयोग करतात, जसे पोल्‍स, क्विझेस्, कथाकथन, माइण्‍ड मॅप्‍स, एण्‍ट्री व एक्झिट तिकिटे, अभिप्राय यंत्रणा आणि प्रत्‍यक्ष प्रयोग. यामुळे दोन-शिक्षक मॉडेल, गृहपाठामध्‍ये साह्य, शंकेचे निरसन आणि परस्‍परसंवादी व्हिडिओ प्‍लेअरच्‍या माध्‍यमातून वैयक्तिकृत अवधान देता येते.

”ऑनलाइन शिक्षण सोयीसुविधेपेक्षा अधिक आहे, जे विद्यार्थ्‍यांना शिक्षण सहजसाध्य करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. क्‍यूरिअस ज्‍युनिअरमध्‍ये आम्‍ही वि़द्यार्थ्‍यांना संरचित अध्‍यापनासह साह्य करण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यामुळे परस्‍परसंवादात्‍मक स्‍पेस तयार होण्‍यास मदत होते, जेथे विद्यार्थी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या क्षमतेनुसार शिक्षण घेऊ शकतात. आमच्‍या दोन-शिक्षक मॉडेलचा वैयक्तिकृत अवधान देण्‍याचा मनसुबा आहे, जे विद्यार्थ्‍यांना कोणत्‍याही संकोचाशिवाय प्रश्‍ने विचारण्‍यास मदत करते,” असे क्‍यूरिअस ज्‍युनिअर येथील अकॅडेमिक हेड सुप्रीत कौर म्‍हणाले.

अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या विषयातील तज्ञ व्‍यक्‍तींनी विकसित केलेला क्यूरिअस ज्युनियरचा अभ्यासक्रम संरचित दृष्टिकोनाचा अवलंब करतो, जेथे रोट मेमरायझेशनच्‍या (तोंडपाठ करून अभ्‍यास करणे) तुलनेत संकल्‍पनेचे आकलन होण्‍यावर भर दिला जातो. या प्रोग्राममध्‍ये विविध वैशिष्‍ट्ये आहेत, जसे दोन-शिक्षक मॉडेलच्‍या माध्‍यमातून वैयक्तिकृत अवधान, गृहपाठामध्‍ये साह्य आणि साप्‍ताहिक चाचणी निकाल, पीटीएम व उपस्थितीवर देखरेख अशा पालकांच्‍या देखरेखीसाठी इंटरअॅक्टिव्‍ह व्हिडिओ प्‍लेअर.

क्‍यूरिअस ज्‍युनिअरमध्‍ये उत्तमरित्‍या संरचित ऑनलाइन क्‍लासरूम अनुभवाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित केले जाते, जेथे प्रबळ अभ्‍यासक्रम पद्धतींचा अवलंब करण्‍यासोबत पात्र व अनुभवी शिक्षक लाइव्‍ह क्‍लासरूमद्वारे अध्‍यापन करतात. क्‍यूरिअस ज्‍युनिअरमध्‍ये लर्निंग किट्सद्वारे प्रत्‍यक्ष प्रयोग यासह सर्वसमावेशक क्‍लासरूम क्रियाकलापांच्‍या माध्‍यमातून उच्‍च स्‍तरीय अध्‍ययन दिले जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading