Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

आदिवासी कुटुंबांचा ‘गुढीपाडवा’ होणार गोड

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे च्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून खंडाळा येथील सावरगाव ठकारवाडी या दुर्गम भागातील आदिवासी वसाहतीमधील १०० कुटुंबांना किमान तीन महिने पुरेल इतका जीवनावश्यक शिधा वितरित करण्यात आला. यानिमित्ताने या कुटुंबांचा गुढीपाडवा सण गोड होणार आहे.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर, पुणे च्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाने सण -उत्सवांचा आनंद घ्यावा, याकरिता सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल, मीठ, मिरची, हळद, मसाले, चहा पाउडर, बिस्कीट, रवा, पोहे, गूळ अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. मराठी नववर्षाची सुरुवात आनंदाने व उत्सवाने व्हावी, तसेच या दुर्गम भागातील कुटुंबांमध्ये सुख शांती नांदावी अशी प्रार्थना देखील देवीचरणी करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading