विनायक नवयुग मित्र मंडळातर्फे पोस्ट ऑफिस मधील महिलांचा सन्मान
पुणे : संपूर्ण टपाल व्यवस्थापनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या डेक्कन जिमखाना पोस्ट ऑफिस मधील महिला भगिनींचा सन्मान विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला.
महिला दिनानिमित्त डेक्कन जिमखाना येथील पोस्ट ऑफिस मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, समर्थ युवा फाउंडेशनच्या संचालिका सरोज राजेश पांडे, सब पोस्टमास्तर कैलास मोरे, असिस्टंट सब पोस्टमास्तर स्वाती वाळुंजकर, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, कार्याध्यक्ष सुनील पांडे, हिंद शक्ती फाउंडेशनचे संचालक अभिजीत मोडक, अक्षय शहाणे, मंडळाच्या महिला अध्यक्ष, गौरी माळी, कार्यकर्त्या वैशाली जोगळेकर, किमया ढेकणे, प्रिया रानडे, ऋतुजा दाणी, केतकी देशपांडे, नीलिमा जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुराडे यांनी केले तर अर्चना सोनवणे यांनी आभार मानले.
