Monday, June 15, 2026
BusinessLatest News

भारतीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारी पाठबळ महत्वाचे : 1,200 संगीतकारांचे देशव्यापी सर्वेक्षण

पुणे : पब्लिक पॉलिसी थिंक टँक ‘द डायलॉग’ ने ‘ट्यूनिंग इनटू चेंज: एम्पिरिकल इन्साईट्स इनटू इंडियाज ईव्हॉल्विंग म्युझिक इंडस्ट्री’ हा संशोधनाधारित अहवाल प्रकाशित केला आहे. 1,200 भारतीय कलाकारांचे सर्वेक्षण करून केलेल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच पुनरावलोकन अभ्यासात भारताची वेगाने वाढणारी संगीत निर्मिती अर्थव्यवस्था, सांस्कृतिक राजनैतिक धोरणातील  त्याची भूमिका, प्रादेशिक प्रतिभेचा उदय आणि दीर्घकालीन शाश्वततेसाठी आवश्यक असलेल्या संरचनात्मक आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 21 भाषांतील कलाकारांना समाविष्ट करत, या अभ्यासात भारताच्या जागतिक संगीत उंचीला कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचे प्रवाह आणि धोरणात्मक शिफारसी मांडल्या आहेत.

प्रथम, प्रस्तावित आशय मूल्यांकन मानकांच्या संभाव्य प्रभावाबाबत भारतीय संगीतकारांमध्ये चिंता असल्याचे यात नमूद केले आहे. जवळपास तीन चतुर्थांश (72%) सहभागी प्रतिसादकांना असे वाटते की अशा अनुपालन आवश्यकता संगीत निर्मितीत व्यत्यय आणू शकतात किंवा प्रकाशन लांबणीवर टाकू शकतात. अशा नियमांमुळे जागतिक सहकार्य अधिक कठीण होऊ शकते अशी चिंता 77% संगीतकारांना वाटते.

दुसरे म्हणजे, या अभ्यासात भारतीय संगीत उद्योगातील सर्जनशीलता आणि विविधतेवर नियमनाचे व्यापक परिणाम अधोरेखित केले आहेत. कोणतेही नवीन अनुपालन उपाय, प्रकाशनापूर्वीची छाननी किंवा पूर्वनियोजित मानकांशी सुसंगतता संगीताच्या विविधतेस आणि सर्जनशील वैशिष्ट्यपूर्णतेवर मर्यादा आणू शकतात असे तब्बल 82% प्रतिसादकांना वाटते. या पार्श्वभूमीवर कलात्मक नवोपक्रमाला चालना देईल अशी लवचिक आणि संतुलित चौकट उद्योगात गरजेची असल्याचे स्पष्ट होते.

‘द डायलॉग’चे संस्थापक काझिम रिझवी भारताच्या संगीत उद्योगाच्या परिवर्तनशील टप्प्यावर प्रकाश टाकत म्हणाले, “भारत एक अभूतपूर्व संगीत पुनरुज्जीवन अनुभवत आहे. आजच्या भारतीय संगीत उद्योगाची व्याख्या करणाऱ्या गतीशीलतेला बाधा न आणता अनुपालन सुनिश्चित करत संरक्षण आणि सक्षमीकरण करणाऱ्या चौकटी अंमलात आणणे हे आताचे आव्हान आहे.”

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बंधने ही एक मोठी चिंता म्हणून समोर आली आहे. ऑनलाईन प्रवाहित होणाऱ्या संगीतासाठी प्रकाशनापूर्वीच्या छाननीला बंधनकारक केले गेले तर अनुपालन खर्च त्यांच्या आर्थिक अंदाजपत्रकावर ताण निर्माण करेल असे 80% कलाकारांना वाटते. जोडीला अशा प्रकाशनपूर्व आशय पुनरावलोकनामुळे कामातील गुंतागुंत वाढेल आणि सर्जनशील अभिव्यक्तीला अडथळा येईल असे 75% संगीतकारांना वाटते.

शेवटी, या अभ्यासात उद्योग विस्ताराला चालना देणाऱ्या धोरणात्मक हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे: 51% संगीतकारांनी प्लॅटफॉर्मवर संगीत स्ट्रीमिंग करण्यातील प्रवेश अडथळे कमी करण्यावर भर दिला, तर 48% संगीतकारांनी भारताच्या थेट संगीत परिसंस्थेतील पायाभूत सुविधांच्या उणिवांकडे लक्ष वेधले. यामध्ये कार्यक्रम सादरीकरणासाठीची जागा आणि तांत्रिक सहाय्य पुरवण्याच्या गुंतवणुकीस मोठी संधी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दररोजच्या 46 कोटी स्ट्रीम्स आणि 2026 पर्यंत 3,700 कोटी रुपयांचा अंदाजित महसूल असताना, भारतीय संगीत एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म 87% महसूल मिळवतात, ज्याला लाखो पेड सबस्क्रायबर्सचे समर्थन आहे. अमेरिका खालोखाल भारत हा आज जगातील दुसरा सर्वात मोठा संगीत स्ट्रीमिंग बाजार आहे. भारतीय बाजार जागतिक ऑडिओ आणि व्हिडिओ स्ट्रीम्सपैकी 14% हिस्सा घेतो. तरीसुद्धा, नियामक अनिश्चितता, पायरसी आणि पायाभूत सुविधांची कमतरता ही वाढ रोखू शकते.

’द डायलॉग’ चे प्रणव भास्कर तिवारी आणि गरिमा सक्सेना यांनी लिहिलेल्या या अहवालात प्रादेशिक कलाकारांना सक्षम करण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओंमध्ये गुंतवणूक, रचनात्मक प्रशिक्षण उपक्रम आणि सरकारी अनुदान यावर भर देण्यात आला आहे. जागतिक संगीत क्षेत्रात भारताचा प्रभाव उंचावण्यासाठी, अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सहकार्य, संगीत महोत्सवांमध्ये सरकारी सुलभ सहभाग आणि संगीत पर्यटन वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. डिजिटल क्षेत्रातील धोक्यांना सामोरे जाण्यासाठी हे उद्योगक्षेत्र आधीपासूनच IT नियम 2021 चे पालन करते. अहवालात सर्वेक्षण केलेल्या कलाकारांनी वाढीस अडथळा आणू शकणाऱ्या अतिरिक्त नियामक स्तरांविरुद्ध सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.

समग्र प्रतिनिधित्व सुनिश्चित करताना, सर्वेक्षणाने प्रादेशिक, शास्त्रीय, लोकसंगीत, इंडी, हिप-हॉप आणि समकालीन शैलीतील संगीतकारांचे प्रतिसाद नोंदवले. यात हिंदी (69%), इंग्रजी (64%) आणि विविध प्रादेशिक भाषांमध्ये (15%) संगीत निर्मिती करणारे कलाकार समाविष्ट होते.

अहवालातील सविस्तर निष्कर्ष पाहण्यासाठी कृपया https://thedialogue.co/publication/suvey-report-tuning-into-change-empirical-insights-into-indias-evolving-music-industry/ येथे भेट द्या.

मुलाखतीकरता विनंतीसाठी कृति सिंग, चीफ ऑफ स्टाफ, द डायलॉग kriti@thedialogue.co यांच्याशी कृपया संपर्क साधा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading