सुजलॉनने जिंदल रिन्युएबल्ससोबतच्या आपल्या सर्वात मोठ्या व्यवसायिक आणि औद्योगिक करारात 204.75 मेगावॅटने केला विस्तार
पुणे : सुजलॉनने जिंदल रिन्युएबल्सच्या उपकंपनी जिंदल ग्रीन विंड 1 प्रा. लि. कडून 204.75 मेगावॅटचे तिसरी ऑर्डर मिळविली आहे, ज्यामुळे भारतातील कमी CO₂ स्टील क्रांतीला आणखी गती मिळाली आहे. या भागीदारीमुळे सुजलॉनसाठी हा व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) क्षेत्रातील सर्वात मोठा करार ठरला असून, याची एकूण क्षमता 907.20 मेगावॅट झाली आहे. यापूर्वी सुजलॉनने छत्तीसगड आणि ओडिशा येथील जिंदल स्टील प्रकल्पांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी 702.45 मेगावॅट पवन ऊर्जेच्या दोन ऑर्डर मिळविल्या होत्या. सध्या सुजलॉनच्या एकूण ऑर्डर बुकपैकी 59% ऑर्डर C&I ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर पोहोचत, ही ऑर्डर बुक 5.9 GW वर पोहोचली आहे.
या नव्या करारांतर्गत सुजलॉन 65 अत्याधुनिक S144 विंड टर्बाइन जनरेटर्स (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरविणार आहे, ज्यांची प्रत्येकी क्षमता 3.15 मेगावॅट असेल.
उत्पन्न होणारी ऊर्जा छत्तीसगड आणि ओडिशा येथील स्टील प्रकल्पांसाठी आत्मवापरासाठी वापरण्यात येईल, ज्यामुळे या प्रकल्पांची सततची कार्यक्षमता सुधारेल आणि भारताच्या हिरव्या ऊर्जा संक्रमणास हातभार लागेल.
सुजलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, “दूरदर्शी संस्थांशी, जसे की, जिंदाल रिन्युएबल्ससोबतच्या आमच्या दृढ भागीदारीद्वारे, भारताच्या स्टील क्षेत्राच्या डीकार्बोनायझेशनला गती देताना आम्हाला अभिमान वाटतो. कर्नाटकमधील आमच्या प्रारंभिक यशावर आधारित, आम्ही आता कमी CO₂ स्टील चळवळ तामिळनाडूपर्यंत विस्तारत आहोत, जे पवन ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. एकत्र येऊन आपण भारतातील शाश्वत औद्योगिक वाढीचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहोत.”
जिंदल रिन्युएबल्सचे अध्यक्ष भारत सक्सेना म्हणाले, “जिंदाल रिन्युएबल्समध्ये आम्ही भारताच्या स्टील उद्योगातील डीकार्बोनायझेशन चळवळ पुढे नेण्यास कटिबद्ध आहोत. सुजलोनसोबतचा हा तिसरा करार आमच्या शाश्वत व्यवहारांच्या बांधिलकीचे आणि भारतातील सर्वात मोठे डीकार्बोनायझेशन सोल्युशन प्रदाता होण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे स्पष्ट प्रतीक आहे.”
सुजलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी म्हणाले, “नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील दशकभराच्या अनुभवासह, सुजलोन स्टील आणि जड उद्योगांसारख्या डीकार्बोनायझेशनसाठी आव्हानात्मक क्षेत्रांना स्वच्छ ऊर्जेकडे नेण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. औद्योगिक वाढ वेगाने होत असताना, शाश्वत ऊर्जा उपायांची गरज यापूर्वी कधीही इतकी मोठी नव्हती. सुजलॉन उद्योगांना त्यांच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये घट करण्यास मदत करणारे नवोन्मेषी पवन ऊर्जेचे उपाय प्रदान करण्यास आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे.”
