“निर्भया कन्या योजना” उपक्रमाचे यशस्वी आयोजन
पुणे: PIMSE आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “निर्भया कन्या योजना” उपक्रमाचे २४ फेब्रुवारी २०२५ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश तरुण मुलींना स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि आरोग्यविषयक जागरूकता प्रदान करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात मिस. नम्रता मुंदडा (स्वसंरक्षण प्रशिक्षक आणि मार्शल आर्ट्स तज्ज्ञ) यांच्या प्रभावी प्रशिक्षण सत्राने झाली. त्यांनी मुलींना स्वसंरक्षणाच्या तंत्रांबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर डॉ. जसिंता बॅस्टियन (संबिधानिक कायदा आणि मानवी हक्क विशेषज्ञ) यांनी महिलांचे कायदेशीर हक्क व संरक्षण कायदे यावर सखोल मार्गदर्शन केले. शेवटचे सत्र डॉ. सौम्यता बोरा (चिरैया NGO संस्थापक व वैद्यकीय तज्ज्ञ) यांनी महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या महत्त्वावर भर देत घेतले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर श्री. झफर अहमद खान यांनी समन्वय साधला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व जागरूकता निर्माण झाली.
