Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNE

PIMSE संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्डरश लॉजिस्टिक्स येथे उद्योगभेट

पुणे: PIMSE संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्डरश लॉजिस्टिक्स प्रा. लि., चाकण येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना वास्तविक लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती देणे हा होता.

संस्थेच्या संचालक डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांनी कोल्डरश लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापक श्री. अजिनाथ गोल्हार यांचा सन्मान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर श्री. गोल्हार यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण लॉजिस्टिक्स यंत्रणेची सखोल माहिती दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लॉजिस्टिक्स प्रक्रिया अधिक कार्यक्षम कशा बनवल्या जातात, याचे स्पष्टीकरण दिले.

विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स उद्योगातील नवीन ट्रेंड्स आणि अत्याधुनिक प्रणालींचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ही औद्योगिक भेट अत्यंत यशस्वी ठरली व विद्यार्थ्यांसाठी मूल्यवान ठरली. माननीय ट्रस्टी श्री. मन्सूर मेहता यांचे या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल विशेष आभार.

Leave a Reply