Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

महाशिवरात्री निमित्त आनंद गोयल यांच्या वतीने श्री तारकेश्वर महादेव मंदिर येथे ९० हजार भाविकांना १८ टन महाप्रसदाचे वाटप

पुणे : येरवडा येथील पांडव  कालीन श्री तारकेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्र मोठ्या उत्साहास साजरी करण्यात आली. राज्य शासन यांच्या कडून ‘क ‘ दर्ज प्राप्त हे पांडव कालीन महादेव मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी आले होते. तसेच याठिकाणी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आनंद गोयल यांच्या  वतीने सुमारे 18 टन फराळाचे (महाप्रसाद ) वाटप करण्यात आले, या महाप्रसादाचा लाभ ९० हजार भाविकांनी घेतला. 

या फराळ वाटापाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद पेठकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे, शिवसेना (उंबाठा ) शहर प्रमुख गजानन थुरकुटे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, हनीफ शेख, राजेंद्र शिरसाट, डॅनियल लांडगे, आनंद गोयल, शशिकांत साटोटे, यशवंत शिर्के, संजय भालेराव, दीपक चावरिया, शैलेश राजगुरू,  सनी गवते, हेमंत यादव, प्रकाश चौरे, शिवदूत किशोर बराथे, मनोज शेट्टी शरद गुप्ते, शशिकांत खराबे, राहुल शेडगे, रत्नकांत धवन, राजीव शितोळे, भरत शेळके, शशी देवकर, परेश खाडके संतोष खळदकर, राहुल करमळकर, वील्सन चंदेलवाल, जयेश पवार, आकाश दुबे, संजय भालेराव, अजित शास्त्री, प्रकाश निकम, सुनील जाधव, शैलेश भोसले, कीर्ती माचरेकर, रुपेश गायकवाड, विशाल मलके उपस्थित होते. 

आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, आनंद गोयल यांच्या पुढाकाराने गेल्या  14 वर्षांपासून मोठ्या उत्साहाने आणि सातत्याने महाशिवरात्रीच्या उत्सवाचे या याठिकाणी आयोजन केले जात आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आज हजारो भाविक या ठिकाणी येवून  फराळाचा लाभ घेत आहेत. त्यांच्या कडून मिळणारे आशीर्वाद हीच आमची शक्ती आहे.

आनंद गोयल म्हणाले, पांडव कालीन श्री तारकेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मागील 14 वर्षांपासून आम्ही शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने येथे फळ व फराळ वाटापाचे आयोजन करत आहोत. जवळपास 18 टन फराळ यासाठी तयार केला जातो. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद झाली आहे. प्रत्येक भाविक याचा आनंद घेतो.   

या प्रसंगी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. राजीव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जाधव यांनी केले. येरवडा पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading