Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRA

नाहूर ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

 

खा. संजय दिना पाटील यांनी केली कामाची पाहणी

मुंबई  – भांडुप – मुलुंडला जोडणा-या नाहुर रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पुर्ण झाले असून लवकरच वाहतुकीसाठी तो खुला केला जाणार आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी आज या ब्रिजच्या कामाची पाहणी केली. ब्रिजच्या दुस-या टप्प्याचे काम लवकरात लवकर सुरु करुन तो वाहतुकीसाठी खुला करावा जेणे करुन वाहनचालकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल. अशा सुचना खा. संजय दिना पाटील यांनी केल्या.

नाहुर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूलाचे निष्कासन, पुनर्बांधकाम व रुंदीकरण करणे हे दोन टप्प्यांतील काम हाती घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजुला १०.५ मीटर रुंदीकरण करण्यात येणार होते. तर दुस-या टप्प्यात पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर मध्यवर्ती भागाचे म्हणजेच सध्याचा पूल पाडून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले असून त्याची भार चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा ब्रीज एलबीएस मार्गाच्या दिशेने एकेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. झालेल्या कामाची पाहणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी करुन अधिका-यांना सुचना केल्या.

लवकरच दुस-या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असून मध्य भाग म्हणजेच सध्याचा पूल (रुंदी 14.9 मीटर) निष्कासन केल्यानंतर मध्य रेल्वे व महानगरपालिकेद्वारे संबंधित भागांमध्ये पुनर्बांधणी केली जाईल. संपूर्ण पूल पुर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी २.५ मी रुंदीचे पदपथासह, ३ x ३ लेनची पुर्व- पश्चिम जोडमार्ग (कनेक्टिव्हिटी) उपलब्ध होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading