PV Tech चा प्रतिष्ठेचा ModuleTech Bankability ‘A’ रेटिंग सन्मान मिळवत Waaree Energies ठरले भारतातील पहिले आणि एकमेव PV सोलर मॉड्यूल निर्माते
भारतातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा कंपनी Waaree Energies Limited ने सौर PV मॉड्यूल उत्पादन क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. PV Tech च्या अगदी अलिकडच्या ModuleTech Bankability रेटिंगमध्ये ‘A’ श्रेणी अंतर्गत स्थान मिळवणारी Waaree Energies ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी ठरली आहे. कंपनीच्या मजबूत आर्थिक कामगिरी आणि स्थिरतेसह प्रगत उत्पादन क्षमता आणि उच्च-गुणवत्तेच्या, विश्वासार्ह सौर मॉड्यूल वितरित करण्याच्या वचनबद्धतेच्या आधारे हा दुर्मिळ सन्मान कंपनीला मिळाला आहे.
PV ModuleTech Bankability रेटिंग्स हे सौर प्रकल्पांमध्ये जोखीम कमी करण्यास आणि दीर्घकालीन परतावा सुनिश्चित करण्यास मदत करणाऱ्या गुंतवणूकदार, विकसक आणि EPCs (Engineering, Procurement and Construction) यांच्यासाठी एक ठोस मापदंड म्हणून काम करतात. ही स्वतंत्र मूल्यमापन प्रक्रिया PV मॉड्यूल उत्पादकांची त्यांच्या आर्थिक स्थिरता, उत्पादन क्षमता, बाजारातील नावलौकिक, विक्रीपश्चात पाठबळ आणि तांत्रिक नाविन्यपूर्णता यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर आधारित तपासणी करते. तसेच या मूल्यमापन प्रक्रियेत उत्पादकांची मूल्यसाखळीतील ताकद, जागतिक शिपिंग क्षमता, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासाठी भांडवली खर्च (Capex), संशोधन आणि विकासातील गुंतवणूक आणि रोख प्रवाह व्यवस्थापन यासारख्या दीर्घकालीन विश्वासार्हता आणि विस्तारक्षमतेच्या मुख्य निर्देशकांचा विचार केला जातो.
सुमारे 15 GW च्या जागतिक उत्पादन क्षमतेसह, Waaree ने मजबूत मूल्यसाखळी आणि जागतिक पुरवठा क्षमतेचा मजबूत ठसा उमटवला आहे. याशिवाय, NABL द्वारे मान्यताप्राप्त Waaree ची चिखली येथील PV Module Test Laboratory (PMTL) कंपनीच्या गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेच्या बांधिलकीवर भर देते. यामुळे मॉड्यूल्स आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेच्या उच्चतम निकषांनुसार तयार होतात. जोडीला Waaree आपल्या TOPCon आणि HJT मॉड्यूल्ससह अत्याधुनिक सौर तंत्रज्ञानामध्ये अग्रणी आहे. ते उच्च कार्यक्षमतेच्या जागतिक दर्जाच्या ऊर्जा उपाय सुविधांसाठी डिझाइन केले आहेत.
या मान्यतेबद्दल बोलताना Waaree Energies Limited चे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पैठणकर म्हणाले, “ही प्रतिष्ठेची मान्यता आमच्या सौर उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. ही मान्यता केवळ आमच्या गुणवत्तेच्या, विश्वासार्हतेच्या आणि शाश्वततेच्या वचनबद्धतेची पुष्टी करते असे नाही तर भारतीय उत्पादकांना जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेच्या नकाशावर स्थान देण्यास मदत करते. भारत ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत असताना अशा जागतिक मान्यतांमुळे भारतीय सौर उत्पादनांची विश्वासार्हता वाढते. त्यायोगे आणखी मोठा आंतरराष्ट्रीय सहयोग व बाजार विस्ताराचा मार्ग मोकळा होतो. Waaree शाश्वत आणि हरित भविष्यासाठी नाविन्यपूर्ण, लक्षणीय उपायसुविधा शोधण्यास कटिबद्ध आहे.”
Waaree ने गुणवत्ता, नाविन्यपूर्णता आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनी जागतिक स्तरावरील सर्वाधिक विश्वासार्ह PV मॉड्यूल उत्पादकांपैकी एक म्हणून स्थान मिळवू शकली आहे. PV Tech च्या ‘A’ रेटिंगने कंपनीला उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवून दिले असून या कंपन्या त्यांच्या आर्थिक ताकद, विश्वासार्हता आणि तांत्रिक प्रगतीसाठी ओळखल्या जातात.
