Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

रेवतीच्या लग्नात अभिराम आणि लीलामध्ये फुलणार प्रेम !

अंतराच्या निधनानंतर अभिराम पहिल्यांदाच गिटार वाजवणार आणि ते ही लीलासाठी !

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रेवतीच्या लग्नाची लगबग सुरू आहे.  लीलाला जाणवतंय की एजे तिच्या प्रेमात आहे. रेवती आणि यशच्या हळद, मेहंदी, संगीत आणि इतर लग्नाच्या  विधींमध्ये एजेची नजर लीलावरून हटतच नाहीये. हे पाहून लीलाला खात्री पटते की एजेचं तिच्यावर प्रेम आहे. खात्री पटल्यावर ती एजे समोर एक अट ठेवते की त्याला स्वतःच्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागेल आणि ती कबुली लीलाला एजेकडून ऐकायची आहे. दरम्यान, दुर्गा विक्रांतला सांगते की शेवटच्या क्षणी यशची जागा घेऊन त्याने रेवतीशी लग्न करावं. या सर्वात लीला, एजेला गिटार आणून  देते जी तो अंतरासाठी वाजवायचा. एजे पुन्हा एकदा गिटार वाजवायची इच्छा दर्शवतो. अंतराच्या निधनानंतर अभिराम पहिल्यांदाच गिटार वाजवणार आहे. आणि ते ही लीलासाठी.

लीला आणि एजे चे हे गोड क्षण आणि दुर्गाच्या  कट कसा हाणून पाडणार लीला आणि एजे ? यासाठी बघायला विसरू नका ‘नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading