Monday, June 8, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

थायक्कुडम ब्रीज बँडच्या सादरीकरणाने वसंतोत्सवच्या पहिल्या दिवसाचा समारोप

 

पुणे : १८ व्या वसंतोत्सवच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात केरळमधील प्रसिद्ध ‘थायक्कुडम ब्रिज’ या बँडचे सादरीकरण प्रेक्षकांनी अनुभविले. या बँडने आजवर जगभरात २५ हून अधिक देशांमध्ये ६०० हून अधिक प्रयोग केले हे विशेष.

या बँडची सर्वच गाणी मी ऐकली असून वसंतोत्सवच्या निमित्ताने ती पुणेकरांना ऐकता यावी म्हणून यावर्षी त्यांचे सादरीकरण ठेवले असल्याचे यावेळी राहुल देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी या बँडचे गायक असलेले कृष्णा बोंगाणे हे उस्ताद रशीद खान यांचे शिष्य असून या आधी आपल्या गुरुंबरोबर मी अनेकदा वसंतोत्सव मध्ये स्वरसाथ केली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. बँड म्हणून आम्ही अनेक ठिकाणी सादरीकरण करतो मात्र वसंतोत्सव चे महत्व आम्हाला माहिती असून या व्यासपिठावर सादरीकरणाची मिळत असलेली संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बँडने मल्याळम, हिंदी आणि मराठी गाणी ही सादर केली. बँडच्या नवरसम अल्बम मधील रचना, तेरी दिवानी… हे गीत या त्यांनी सादर केलेल्या गाण्यांना उपस्थितांनी दाद दिली. याबरोबरच सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांना ट्रीब्युट म्हणून ‘खेळ मांडला…’ हे गाणे बँडने प्रस्तुत केले. बँडमध्ये कृष्णा बोंगाणे सुजित सुकुमारन यासोबतच नीलामाधव मोहापत्रा, गोविंद पितांबरन यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading