आरंभ होणार नव्या परंपरेचा उलगडणार महिमा स्वामी मुखवट्याचा
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत अलौकिक चरणपादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय सध्या सुरू आहे. या अध्यायातली आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींची गोष्ट रंजक टप्प्यावर आहे. स्वामी देवकीच्या कुटुंबाला चरणपादुका देतात आणि एक प्रतिकात्मक मुखवटाही देतात. देवकी आणि यमुनाच्या वैचारिक प्रवासात प्रेक्षकांना श्रद्धा आणि संशय यामधील संघर्ष अनुभवता येत असून विश्वास, श्रद्धा आणि कर्म यांच्यातील द्वंद्व आणि अध्यात्मिक लीला रंजक गोष्टीद्वारे उलगडते आहे, स्वामींच्या आशीर्वादाने, देवकी बाळंतपणात ज्या जीवघेण्या परिस्थितीत असते, त्यातून कशी बाहेर पडते ?. स्वामींच्या मुखवटा – पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिशाच्च सावली नेमकी कशी दूर होते,मात्र हे होऊनही देवकीला पुत्रसुख प्राप्त होते का ? याचा रंजक उलगडा या भागात होणार आहे.
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.
