एचडीएफसी सिक्युरिटीजने रिटेल रिसर्च डिव्हिजनचे नाव बदलून एचएसएल प्राइम रिसर्च केले; देवर्ष वकील यांनी नवीन प्रमुख म्हणून स्वीकारला कार्यभार
मुंबई : एचडीएफसी बँकेची उपकंपनी आणि भारतातील आघाडीची शेअर ब्रोकिंग फर्म एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड (एचएसएल) ने त्यांच्या रिटेल रिसर्च डिव्हिजनचे नाव बदलून “एचएसएल प्राइम रिसर्च” केले आहे. या धोरणात्मक बदलातून कंपनीची संशोधन क्षमता सुधारण्याची आणि ग्राहकांना प्रीमियम इनसाईट्स प्रदान करण्याची बांधिलकी अधोरेखित होते.
एचएसएल प्राइम रिसर्च हा बदल एचडीएफसी सिक्युरिटीजच्या उच्च-गुणवत्तेचे, सतत बदलणाऱ्या बाजारपेठेत गुंतवणूकदारांना सूज्ञ निर्णय घेण्यास सक्षम करेल अशी उपयुक्त माहिती पुरवण्याच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. या बदलामुळे ग्राहकांना विस्तारित संशोधन कव्हरेज, बाजारपेठेतील सखोल माहितीपूर्ण ज्ञान आणि त्यांच्या गरजांनुसार सानुकूलित गुंतवणूक धोरणे मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, या परिवर्तनाचा एक भाग म्हणून श्री. देवर्ष वकील यांची एचएसएल प्राइम रिसर्चचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी श्री. दीपक जसानी यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्री. जसानी यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर 31 डिसेंबर 2024 रोजी निवृत्ती घेतली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धीरज रेली यांनी रिटेल रिसर्च विभागासाठी श्री. जसानी यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करताना म्हटले, “दीपक यांच्याकडील माहितीपूर्ण ज्ञान आणि कौशल्य हे आमच्या यशाचा पाया होते. त्यांनी उद्योगक्षेत्रामध्ये एक आदरणीय ठेवा मागे ठेवला आहे आणि त्यांच्या जीवनातील नवीन अध्याय सुरू होत असताना आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.”
श्री. वकील यांनी 1 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत करताना श्री. रेली यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या विस्तृत अनुभवाचा आणि रिटेल रिसर्च टीममधील महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. श्री. वकील यांचा अंतर्गत टीम्स आणि ग्राहकांशी असलेला दृढ संवाद आणि भांडवली बाजारातील सखोल ज्ञान, एचएसएल प्राइम रिसर्चला पुढील पातळीवर नेण्यास सक्षम आहे. श्री. रेली म्हणाले, “ही नियुक्ती आमच्या संस्थेमधील प्रतिभेचे दर्शन घडवते आणि करिअर विकासासाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करते. देवर्ष यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही एचएसएल प्राइम रिसर्च अंतर्गत आमच्या संशोधन सेवा पुन्हा परिभाषित करण्यासाठी उत्सुक आहोत.”
या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना एचएसएल प्राइम रिसर्चचे प्रमुख श्री. देवर्ष वकील म्हणाले, “एचएसएल प्राइम रिसर्च टीमचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणूक प्रवासामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक माहिती मिळवून देत सक्षम करत आमचे उद्दिष्ट संशोधनाच्या गुणवत्तेत आणि नावीन्यपूर्णतेत नवीन मापदंड प्रस्थापित करण्याचे आहे. आम्ही बाजारातील गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी त्यांचे विश्वासू भागीदार होण्याचे लक्ष्य ठेवत आहे.”
एचएसएल प्राइम रिसर्च त्यांच्या सेवांच्या एक भाग म्हणून तज्ज्ञ विश्लेषकांच्या टीमकडून केले जाणारे एकात्मिक मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणावर आधारित सर्वोत्तम गुंतवणूक संधी पुरविते. या पैकी बहुतांश विश्लेषक गेल्या दशकभरापासून एचडीएफसी सिक्युरिटीजशी जोडले गेले आहेत. ही टीम नियमितपणे बाजारपेठेतील भावना, घडामोडींवर आधारित टिप्पणी, डेरिव्हेटिव्ह्सच्या शिफारसी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी स्टॉकच्या शिफारसी पुरविते. जोडीला ग्राहकांना सानुकूलित गुंतवणूक धोरणे विकसित करण्यात मदत करण्यासाठी एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) शिफारसी देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना लहान रकमांची कालांतराने गुंतवणूक करून दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करता येतो.
एचएसएल प्राइम रिसर्च “पिक ऑफ द वीक”, “रोलओव्हर अॅनालिसिस”, “दिवाळी पिक्स” आणि “न्यू इयर पिक्स” यांसारख्या विशेष अहवालांची निर्मिती करते. ही संशोधन माहिती ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप; इन्व्हेस्टराइट आणि एचडीएफसी स्काय यासारखे ऑनलाइन अॅप्लिकेशन्स तसेच कंपनीच्या वेबसाइट अशा विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
या अहवालांच्या जोडीला संशोधन टीम नियमितपणे न्यूजलेटर तयार करते आणि देशभरातील प्रख्यात शेअर बाजार तज्ञांसोबत वेबिनार आयोजित करते. या उपक्रमामुळे केवळ एचडीएफसी सिक्युरिटीजच्या ग्राहकांना नाही, तर गुंतवणुकीबद्दलचे ज्ञान आणि कौशल्य वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही फायदा होतो.
ग्राहकांना वित्तीय बाजारपेठेत मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असलेली अतुलनीय माहिती मिळेल हे सुनिश्चित करत एचएसएल प्राइम रिसर्चच्या सादरीकरणाने एचडीएफसी सिक्युरिटीजच्या संशोधन क्षमतांचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळते. हा नवीन विभाग व्यापक बाजार विश्लेषण, गुंतवणूक विषयक माहिती आणि विद्यमान तसेच संभाव्य ग्राहकांच्या बदलत्या गरजांसाठी डिझाइन केलेल्या विविध संशोधन उत्पादनांद्वारे तज्ञांचे भाष्य यावर लक्ष केंद्रित करेल.
