Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

दिग्दर्शक शरद गोरे यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या’ या मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी

पुणे: कान्स आणि बर्लिननंतर आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  दिग्दर्शक शरद गोरे यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या’ या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये नितीन रतिलाल पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर दिग्दर्शनासाठी शरद गोरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

शरद गोरे यांनी या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत अभिनेता नितीन रतीलाल पाटील व अभिनेत्री प्राची सूर्यवंशी या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार स्वतः शरद गोरे असून चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

चित्रपट क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्व असलेल्या कान्स व बर्लिन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशस्वी ठसा उमटवल्यानंतर ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये शरद गोरे यांना उत्कृष्ठ दिग्दर्शक व नितीन रतीलाल पाटील यांना उत्कृष्ठ अभिनेता हे दोन पुरस्कार मिळवून जागतिक स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव उंचावले आहे.

चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अमोल कुंभार आणि सुनील साबळे यांनी देखील या चित्रपटासाठी अथक परिश्रम केले आहेत. तर छायांकन  रवींद्र लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading