Monday, June 8, 2026
BusinessLatest News

एनएसई अकॅडमी लिमिटेडचा भारतात जागतिक दर्जाचे प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स पुरविण्यासाठी फायनान्शियल मॉडेलिंग इन्स्टिट्युटशी करार

एनएसई अकॅडमी लिमिटेड (एनएएल) या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने फायनान्शियल मॉडेलिंग इन्स्टिट्युट (एमएमआय) या टोरांटो, कॅनडास्थित कंपनीशी करार केला आहे. व्यावसायिक नोकरदार, तसेच विद्यार्थ्यांच्या आर्थिक मॉडेलिंग क्षमता उंचावत त्यांना जागतिक वित्त आणि अकाउंटिंग क्षेत्रात दमदार संधी मिळविण्यासाठी तयार केले जाणार आहे.

डेटाच्या मदतीने निर्णय घेण्याचे प्रमाण वाढत असून, आजच्या रोजगार बाजारपेठेत आर्थिक मॉडेलिंग कौशल्यासाठी असलेली मागणी वाढत आहे. या भागीदारीमुळे एनएसई अकॅडमीचे भारतीय आर्थिक शिक्षण यंत्रणा क्षेत्रातील व्याप्ती आणि एफएमआयचे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले सर्टिफिकेशन एकत्र होणार आहे. दोन्ही संस्थांचे स्रोत व कौशल्य एकत्र करून, आर्थिक मॉडेलिंग क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन देण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. पर्यायाने सहभागींना कामाचा प्रत्यक्ष अनुभव, तसेच आर्थिक क्षेत्रात करियर घडविण्यासाठी आवश्यक विश्लेषणात्मक विचार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

या भागीदारीचा एक भाग म्हणून एनएसई अकॅडमी एफएमआय सर्टिफिकेशन्सचा शैक्षणिक उत्पादनांमध्ये समावेश करणार असून, त्यामुळे विद्यार्थी, आर्थिक व्यावसायिक, करियरच्या मध्यावर असलेले व स्थित्यंतरासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्थिक मॉडेलिंग प्रमाणपत्र मिळवू इच्छिणारे यांची सोय होईल. या प्रोग्रॅम्समध्ये महत्त्वाचे विषय घेतले जाणार असून, त्यात आधुनिक आर्थिक विश्लेषण, इन्व्हेस्टमेंट, अंदाजपत्रक, बजेटिंग, मूल्यांकन यांचा समावेश असेल. यामुळे मूलभूत शिक्षणाचा सुयोग्य पाया रचला जाईल व आधुनिक शिक्षणाची वाट सोपी होईल.

याप्रसंगी फायनान्शियल मॉडेलिंग इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक श्री. आयन स्कूनूर म्हणाले, ‘फायनान्शियल मॉडेलिंग इन्स्टिट्युटला एनएसई अकॅडमीच्या मदतीने विद्यार्थी आणि व्यावसायिकांना आर्थिक मॉडेलिंग प्रोग्रॅम व प्रमाणपत्र देताना आनंद होत आहे. आमच्या प्रोग्रॅममध्ये महत्त्वाच्या संकल्पना आणि आर्थिक मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, तसेच व्यावसायिकांना स्पर्धात्मक परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. एफएमआय अक्रेडिशन्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपले करियर उंचावता येईल, तसेच त्यांच्या कंपनी व ग्राहकांना आणखी मूल्य मिळवून देता येईल.’

याप्रसंगी एनएसई अकॅडमी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिलाश मिश्रा म्हणाले, ‘फायनान्शियल मॉडेलिंग इन्स्टिट्युटसह करण्यात आलेली भागीदारी एनएसई अकॅडमीच्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांना उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम करणार आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले फायनान्शियल मॉडेलिंग अक्रेडिशन्स प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करत, आम्ही उमेदवारांना वित्त आणि अकाउंटिंग क्षेत्रातील उच्च पदे मिळविण्यासाठी आत्मविश्वास देण्याचे ध्येय ठेवले आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading