Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

कलर्स मराठीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिका आली रोमांचक वळणावर

 

कलर्स मराठीवरील ‘ #लय आवडतेस तू मला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेत सानिका आणि सरकार यांच्या नात्यातील ताणतणाव आणि रोमांचकारी घटनाक्रमांची गुंफण प्रेक्षकांना अत्यंत आवडते आहे.

या आठवड्यात तुम्ही पाहू शकता की, सानिकाच्या घरी तिला बघण्याच्या कार्यक्रम सुरु असतो तर दूसरीकडे सरकार आणि सईचा सुपारी फुटण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे. तेव्हढ्यात रेससाठी घराबाहेर पडलेल्या सानिकाला बघून सरकारचे मित्र त्यांना सानिका दिसल्याचे सांगतात. आणि सरकार कार्यक्रम सोडून तिला चेन परत देण्यासाठी निघून जातो.

एकादेखी सरकार सनिकाची अचानक भेट घडते. त्यानतंर रेस साठी चीफ गेस्ट म्हणून आलेला सर्वेश सानिकाला बघतो. तर दूसरीकडे , पंकजा वसूच्या वस्तू सानिका अजूनही बाळगून आहे म्हणून चिडून जाते आणि ती साहेबरावांना पण दाखवते. वसूच्या वस्तू पाहून साहेबराव देखील चिडतात. सानिकाच रेस बद्दलच सत्य घरी समजल्यावर साहेबराव काय करतील? हे पाहाणे महत्वाचे ठरले.

पहा नवी प्रेम कहाणी ‘#लय आवडतेस तू मला’ दररोज रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading