Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

श्री शनी मारुती बालगणेश मंडळातर्फे लक्ष्मींचा सन्मान


पुणे : नागरिकांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठी झटणाऱ्या लक्ष्मींचा श्री शनी मारुती बालगणेश मंडळातर्फे आज (दि. 1) कृतज्ञता सन्मान करण्यात आला. लक्ष्मी पूजनाचे निमित्त साधून श्री शनी मारुती मंदिरात या हृद्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, आरोग्य अधिकारी गणेश खिरिड, विभागीय आरोग्य निरीक्षक नितीन लोखंडे, रुपाली मगर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष दीपक निकम आदी उपस्थित होते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना फेटे बांधून मान्यवरांच्या हस्ते त्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्य ती दखल घेऊन दरवर्षी सन्मान केला जात असल्याचे सचिन पवार यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
विजय नायकल म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांचे काम खूप महत्त्वाचे आहे. पण त्यांच्या कामाची फारशी दखल घेतली जात नाही. श्री शनी मारुती बाल गणेश मंडळातर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा उपक्रम सामाजिक भावनेतून राबवित आहे, ही आनंददायी गोष्ट आहे.
सफाई कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते, असे शिरीष मोहिते म्हणाले.
विवेक वेलणकर म्हणाले, लक्ष्मी पूजनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे काम किती उपयुक्त आहे, याची माहिती नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांना सन्मानाने बोलवून त्यांचा गौरव करणे ही अतिशय आनंददायी बाब आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिनेश पेंढारे, विजय पवार, राहुल मारणे, रोहित घाणेकर, केतन गायकवाड, अक्षय पेंढारे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading