Monday, June 8, 2026
BusinessLatest News

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरने Q2 FY25 निकाल जाहीर केले

 22% वार्षिक वाढीसह EBITDA ₹607 कोटी

46% वार्षिक वाढीसह PAT ₹ 374 कोटी

 

मुंबई+ : जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आणि भारतातील दुसऱ्या सर्वात मोठा खासगी व्यावसायिक पोर्ट ऑपरेटर जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (“कंपनी”) 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

 

Q2 FY25 मधील प्रमुख मुद्दे

  • 27.5 दशलक्ष टन माल हाताळणीसह वार्षिक 16% वाढ
  • ₹1,088 कोटींचा महसूलवार्षिक 22% ची वाढ
  • वार्षिक 22% वाढीसह ₹607 कोटींचा EBITDA
  • वार्षिक 46% वाढीसह ₹374 कोटींचा PAT
  • मजबूत ताळेबंदप्रगतीसाठी अत्यंत योग्य स्थिती

o   रोख आणि रोख समतुल्य ₹4,501 कोटी

सर्वसमावेशक आर्थिक कामगिरी Q2 FY25

 

या तिमाहीतकंपनीने 27.5 दशलक्ष टन मालवाहतूक केलीजी गेल्या वर्षीच्या तुलनेत 16% नी अधिक आहे. मंगळूरपारादीप आणि एन्नोरच्या कोळसा टर्मिनल्समधील वाढीव वापरामुळे आणि अधिग्रहणातील (PNP आणि लिक्विड स्टोरेज टर्मिनल, UAE) योगदानामुळे व्हॉल्युम वाढ झाली. विशेष म्हणजे, 48% वार्षिक वाढीसह थर्ड पार्टीचा सहभाग वाढला आणि एकूणच प्रगतीत थर्ड पार्टीचा वाटा वर्षभरापूर्वीच्या 36% च्या तुलनेत 46% इतका होता.

 1,088 कोटी रुपयांच्या एकूणच महसुलात या व्हॉल्युम वाढीचे योगदान 22% आहे. 55.8% च्या मजबूत मार्जिनसह EBITDA 607 कोटी (+22% YoY) इतका वाढलातसेच PAT  374 कोटी इतका झालाजो दरवर्षी 46% ची ठोस वाढ दर्शवितो.

व्यवसायातील प्रमुख मुद्दे

  • मुरबेमहाराष्ट्र येथे ग्रीनफिल्ड पोर्ट डेव्हलपमेंट: महाराष्ट्रातील मुरबे येथे ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी कंपनीने सर्वाधिक बोली लावली आहे. प्रत्येक हवामानासाठी सक्षम ठरण्यासोबतच हे बंदर बहु-कार्गो व्यावसायिक बंदर म्हणून उदयास आले आहे. प्रस्तावित बंदर राष्ट्रीय महामार्ग 8 आणि राज्य महामार्ग (बोईसर रोड) आणि दिल्ली-मुंबई ट्रंक रेल्वे मार्ग व समर्पित वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर यांसारख्या प्रमुख महामार्गांजवळ आहे.
  • जयगड आणि धरमतर येथे 36 MTPA ब्राउनफिल्ड क्षमता विस्तार: संबंधित उपकंपनीच्या मंडळाने एकूण 36 MTPA (धरमतर येथे 21 MTPA आणि जयगड येथे 15 MTPA) क्षमतेच्या विस्तार योजनेस मान्यता दिली आहे. ₹2,359 च्या एकूण कॅपेक्समध्ये नवीन बर्थसाठी यांत्रिक, नागरी आणि इलेक्ट्रिकल काम व थर्ड पार्टी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांचा समावेश आहे. विस्तारामुळे जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या 55 MTPA वरून 70 MTPA आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या 34 MTPA वरून 55 MTPA होईल. डॉलवी, महाराष्ट्र येथे प्रस्तावित 5 MTPA स्टील-निर्मिती सुविधेच्या मागे आपल्या ग्राहकाच्या मालवाहू मालाची पूर्तता हे या विस्ताराचे उद्दिष्ट आहे. दोन्ही बंदरांच्या विस्तारामुळे अंदाजे 27 MTPA अतिरिक्त कार्गो हाताळणी होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बंदरांचे बांधकाम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
  • नवकार कॉर्पोरेशन लिमिटेडमधील बहुसंख्य भागभांडवल संपादन: कंपनीने नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड (“नवकार”) मधील प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचे 70.37% शेअरहोल्डिंग संपादन करण्यासाठी पूर्वी घोषित केलेले अधिग्रहण पूर्ण केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading