Assembly Election 2024 : शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
महायुतीमधील भाजप पक्षाने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली होती. तसेच अजित पवारांनी देखील काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे आता जागावाटपावरील मतभेद निवळण्यास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. काही जागांवर महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा त्याग करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला आहे.



