देशप्रेमी, सैध्दांतिक व तत्वनिष्ठ ऊद्योगपती हरवला – गोपाळदादा तिवारी
‘स्वतंत्र भारताच्या’ ऊभारणी नंतर ‘देशास आत्म निर्भर व प्रगतीशील बनवण्यात’ अग्रेसर राहीलेले उद्योजक घराणे स्व सर जमशेद जी टाटा यांचा वारसा पुढे नेणारे भारतीय ऊद्योजक पद्मविभूषण स्व रतन कुमार जी टाटा यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “भावपुर्ण श्रध्दांजली” अर्पित केली..! ते पुढे म्हणाले की,
मा स्व रतनकुमार टाटा हे भारताच्या ‘राष्ट्र उभारणीत’ कृतीशील भुमिका निभावणारे, देशाचे हित पहाणारे, देशप्रेमी, सैध्दांतिक व तत्वनिष्ठ ऊद्योगपती होते..! देशातील प्रचलीत भांडवलशहा ऊद्योगपतींमध्ये त्यांची गणना होऊ शकत नाही..! त्यांच्या जाण्याने देशा बरोबर महाराष्ट्राने एक सह्रृदयी, मानवतावादी समाजप्रेमी, दुरदृष्टीचा ऊद्योजक गमावला आहे..!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे “भावपुर्ण श्रध्दांजली” …
