Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावे, केंद्रात मंत्रीपद देवू – रामदास आठवले

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathavale) यांनी दिली आहे. 

आंबेडकर यांचा पक्ष इतकी वर्ष निवडणूक लढवत आहे. मात्र, त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत. त्यांच्या पक्षाला अद्याप मान्यता देखील मिळालेली नाही. आपला पक्ष देशभरात आहे. नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये आहे. आंबेडकर आपल्याबरोबर आले तर बहुजन समाज एकत्र येईल. आंबेडकर यांच्या पुढाकाराखेरीज रिपब्लिकन ऐक्य प्रत्यक्षात उतरू शकत नाही. त्यांनी पुढाकार घेतल्यास आपण अध्यक्षपदाचा आग्रह धरणार नाही. एकत्रित रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद आंबेडकर यांनी घ्यावे, असेही आठवले म्हणाले. 

आरपीआयला विधानसभेत हव्या 10 ते 12 जागा 

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे दोन उमेदवार निवडून येणे शक्य होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. आता महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला दहा ते बारा जागा मिळाव्या. त्यापैकी चार ते पाच जागा विदर्भात मिळाव्या, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

केंद्रातील सरकार पूर्ण करणार कार्यकाळ 

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन पडणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, हा प्रश्न अनाठायी आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुमत आहे. अर्थातच केंद्रातील सरकार निश्चितपणे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading