Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

“दम असेल तर तोंडावर बोल”; निक्कीचं संग्रामला खुलं चॅलेंज

Bigg Boss Marathi Day 51 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ सुरू होऊन आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसानंतरही सदस्य धमाका करताना दिसून येत आहे. निक्की, अरबाज आणि संग्राम यांच्यात कायम वाद होताना दिसून येतात. आता आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांच्यात खटके उडताना दिसून येणार आहेत. “दम असेल तर तोंडावर बोल”, असं निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना दिसून येईल.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना दिसत आहे. तर संग्रामही निक्कीला तिच्या खेळाबद्दल बोलताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की आणि अरबाजला संग्राम म्हणतोय,”जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं”. त्यावर निक्की म्हणतेय,”फुसकी बाँबसारखं इनडायरेक्ट बोलायचं नाही या घरात…दम असेल तर तोंडावर बोलायचं”.

संग्राम पुढे म्हणतोय,”कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवताय”. पुढे निक्की म्हणतेय,”स्वत:चं डोकं थोडं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशा परिस्थितीत तुम्ही अडकले आहात”. संग्राम पुढे म्हणतोय,”तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहात”.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading