Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित मागासवर्गीय धडा शिकवतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

राहुल गांधींच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष राज्यभर आंदोलन करणार

मुंबई : अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले आरक्षण राहील.आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो. खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल. अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली.

उद्या शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे

सामाजिक दृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस ही आरक्षण विरोधी असल्याचेच उघड केले आहे.काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत राहिली आहे.त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झाले आहेत .आज ही दलितांवर अत्याचार होतात.त्यामुळे दलित आदिवासी मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती असा सवाल ना.रामदास आठवले यांनी केला आहे .

आरक्षण संपविण्याचा भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित आदिवसी मागासवर्गीय धडा शिकवतील असा इशारा ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.
परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही असे परदेशात जाऊन बरळणे चूक आहे.लोकतंत्र आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो असे ना.रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading